जनकापूर येथे दोन दिवसांपासुन दोन अस्वलिंचा मुक्काम : गावात भिती वातावरण

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

दि.२५/११/२०२२

तळोधी बा.

नागभिड वनपरिक्षेत्रातील जनकापूर येथे दोन दिवसांपासुन दोन अस्वली मुक्कामी असुन गावातील घरा शेजारी रात्रभर बसुन राहतात व दिवस निघताच गावाशेजारी झुडपी जंगलात दबा धरुन असतात त्यामुळे गावात भिंतीचे वातावरण पसरले असुन वनविभागाला यांची माहिती देवून ही वनविभागाचे कर्मचारी आता पर्यंत घटनास्थळावर पोहचले नाहीत. मात्र गावकरी या अस्वलीलां दोन दिवसांपासुन हाकलत आहेत.

सध्या या परिसरात धनकापनीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे महिला वर्ग सकाळिच उठतं असतो.अस्यातच काल २४ तारखेला प्रितम मेश्राम यांचे घरामागे दोन अस्वली बसल्या होत्या त्या दिसताच त्यांनी स्वतः काल हाकलून लावल्या मात्रा घराशेजारी झुडपी जंगलात दबा धरून बसलेल्या होत्या.आज दि.२५तारखेला पुन्हा शैलेश मेश्राम, व पेटकुले यांचे घराजवळ सकाळी पुन्हा निघाल्या त्यामुळे गावात भितिचे वातावरण पसरले आहे.वनविभागाला यांची माहिती देवून सुध्दा वनविभागाचे कर्मचारी घटनेचे वृत्त लिहेपर्यत घटनास्थळी पोहचलेले नव्हते.त्यामुळे वनविभागा बद्दल जनतेच नाराजी व्यक्त केली आहे.
गावात अस्वल या वन्यप्राण्यानी धुमाकुळ घातला असुन जिवितहानी होण्याची वाट वनविभाग बघत आहे काय? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.या अस्वलीचा त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी गावकरी यानी केली आहे