रेल्वे पूल कोसळून एका महिलेचा मृत्यू तर अनेक गंभीर जखमी

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर 

दि.२७/११/२०२२

बल्लारपूर

#Railway Bridge collapsed at Ballarpur

बल्लारपूर रेल्वे स्टेशन वरील पूल नंबर एक कोसळून अनेक जण गंभीर जखमी झाले. सर्व सर्व जखमींना चंद्रपूर येथील सर्वसामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले.
सदर घटना दिनांक 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चारच्या दरम्यान घडली. काजीपेट पुन्हा व बल्लारपूर वर्धा या पॅसेंजर साठी प्रवासी घाई गर्दीने प्लॅटफॉर्म नंबर एक वरून पाच वर जात होते. ही गंभीर घटना घडली. त्यात तेरा लोक जखमी झाल्याचे विश्वसनीय सूत्राकडून समजते. या प्लॅटफॉर्मला काही महिन्यापूर्वीच रंगरंगोटी करून लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. विशेष बाब म्हणजे पूर्ण भारतातून दुर्घटनाग्रस्त पूल स्वच्छता व सुंदरतेसाठी दुसऱ्या नंबरचा क्रमांक पटकावला. भोंगळ कारभार समोर येत असून याची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी बल्लापूर वाशी यांनी केली आहे. आत्ताच या रेल्वे पुलाची दांडूची करून रंगरंगोटी केल्यानंतरही फुल खसलाच कसा असा प्रश्न जखमीच्या नातेवाईकांना पडलाय, सदर बाब खूप गंभीर असून याची वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्यात यावी

 

सदर रेल्वे ओव्हर ब्रिज कोसळल्यामुळे जखमी झालेल्या नागरिकांना चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या भरती रुग्णांची जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

रुग्णांवर रुग्णालय प्रशासनाने व्यवस्थित उपचार करावे. तसेच सामान्य रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयात भरती असलेल्या सर्व रुग्णांची योग्य प्रकारे काळजी घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले. रेल्वे ब्रिजचे ऑडिट करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाला दिल्या जाईल असेही ते म्हणाले.

 

अपघातात गंभीर जखमी असलेल्या 48 वर्षीय निलिमा रंगारी यांचे उपचारादरम्यान चंद्रपुर सामान्य रुग्णालयात निधन झाले.प्रकृती गंभीर असल्याने रंगारी यांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, तसेच रंजना खरतड यांनाही खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलल्या जात आहे त्यांचेवर शर्थीचे उपचार सुरू आहेत .

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी भरती रुग्णांच्या नातेवाईकांसोबतही संवाद साधला. मृत नीलिमा रंगारी यांच्या नातेवाईकांनी जिल्ह्यातील रेल्वे ब्रिज चांगले करण्याची मागणी केली. तसेच गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मवर येईल याची घोषणा रेल्वे प्रशासनाकडून होत नाही. सुरुवातीला वेगळे सांगितले जाते व नंतर अचानक प्लॅटफॉर्म बाबत वेगळी माहिती मिळत असल्याने प्रवाशांची धावपळ होते, असे म्हणून नातेवाईकांनी रेल्वे प्रशासनावर संताप व्यक्त केला.

अति दक्षता विभागात रंजना खडतड, वय 55 वर्ष, तर इतर वार्डात  छाया भगत, 45 वर्ष, निधी भगत, 21 वर्ष,  चैतन्य भगत, 18 वर्ष, साची पाटिल, 29 वर्ष, अंजली वर्मा, 21 वर्ष,  आहेत तर प्रिया खडतड, 28 वर्ष, अनुराग खडतड, 30 वर्ष यांना रूग्णालयातून उपचार करून घरी पाठविलेले आहे .

सद्यस्थितीत प्लॅटफॉर्म क्र 1 व 2 बंद करण्यात आहे आहेत. उर्वरीत प्लॅटफॉर्म क्र 3.4 व 5 सुरू आहेत.