By Mr. Bhuvan Bhonde Corruspondent, News Jagar
Date 27/11/2022
देसाईगंज
विविध राष्ट्र घटनांचा तौलनिक अभ्यास करून स्वतःच्या ज्ञानाच्या भरोशावर अथक परिश्रमाने तयार केलेले भारताचे संविधान , हे स्वतंत्र भारतातील नागरिकांचे जगण्याचे मुलतंत्र आहे. असे प्रतिपादन नेवजाबाई वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक तथा सामाजिक विचारवंत डॉ. युवराज मेश्राम यांनी केले.ते देसाईगंज शहर बौध्द समाज कोअर कमेटी व सम्यक जागृत बौद्ध महिला समिती दीक्षाभूमी यांचे वतीने आयोजित संविधान दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना बोलत होते. मुख्य मार्गदर्शक म्हणून उच्च न्यायालय नागपूर चे अधिवक्ता अँड. कबिर एस.कालीदास यांनीही यावेळी यथोचित मार्गदर्शन केले.
याप्रसंगी ओ.बि.सी. संघटनेचे लोकमान बरडे, आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे किशोर कुमरे, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार , दि बुद्धिस्ट सोसायटी चे जिल्हाध्यक्ष इंजि. नरेश मेश्राम, दीक्षाभूमी महिला समितीच्या सचिव ममता जांभुळकर, बोद्ध समाज कोअर कमेटीचे सल्लागार अँड. बाळकृष्ण बांबोळकर, डाकराम वाघमारे, अध्यक्ष प्रकाश सांगोळे, आदिवासी विद्यार्थी संघाचे नंदुभाऊ नरोटे व शिक्षक नेते अनिल मुलकलवार यांनी प्रमुख अतिथीचे स्थान भूषविले. मार्गदर्शनापुर्वि कोअर कमेटीचे सदस्य आशिष घुटके यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोअर कमेटीचे सल्लागार राजरतन मेश्राम, प्रास्ताविक कार्यक्रमाचे मुख्य संयोजक विजय बन्सोड तर आभार सदस्य दिलीप शेंडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी बौद्ध समाज कोअर कमेटीचे सल्लागार प्रा.बि.पि.पडवेकर, हंसराज लांडगे, रमेश रंगारी, जयश्री लांजेवार, उपाध्यक्ष साजन मेश्राम, वंदना धोंगडे, सहसचिव अजय ढोक ,कविता निरंजने, कोषाध्यक्ष पवन गेडाम ,सदस्य भिमराव नगराळे, दिलीप उके, सागर बन्सोड, अंकोश गोंडाणे, एन.आर.रामटेके, द्रौपदी सुखदेवे, मिना शेंडे, आशा दहिवले, अनिता मेश्राम, कल्पणा वासनिक, शेवंता बन्सोड, टिना ठवरे, ममता रामटेके, सुरज ठवरे, बंडु तांबे, मंगेश भैसारे, पुरुषोत्तम बडोले, प्रितम जनबंधु, नरेश लिंगायत, बंडू म्हैसकर, सुनील सहारे, विवेक लोखंडे, विजय पिल्लेवान, राजकुमार मेश्राम आदिंनी सहकार्य केले.