सावरगाव येथे वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

दि.२८/११/२०२२

सावरगाव 

तळोधी बाळापूर वन सर्कल अंतर्गत येणाऱ्या सावरगाव येथील बाजीराव कोहरे यांच्या शेतात भात कापणी करत असताना संगीता संजय खंदारे (45) या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले.

धुक्यामुळे त्यांच्या शेतातील भात कापणी 2 दिवसापासून सुरू झाली होती, मात्र आज केवळ 2 महिलाच शेतात कापणीचे काम करत असताना भात कापणी कमी झाल्याने काहीवेळा वाघाने शेजारच्या झुडपातून उडी मारली संगीता संजय खंदारे यांनी तिला मानेला धरले. तिला ओढत जंगलाकडे नेले, मात्र तेथे उपस्थित असलेल्या बाजीराव खंडारे यांच्या मुलाने महिलेची वाघाच्या तावडीतून सुटका केली. तात्काळ मदतीसाठी फोन केल्यानंतर तिला तळोधी ग्रामीण आरोग्य केंद्रात नेण्यात आले, तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले होते मात्र चंद्रपूर सामान्य रुग्णालयात पोहचताच महिलेचा मृत्यू झाल्याचे कळले आहे. tiger kiiled women at sawargav

घटनेची माहिती मिळताच तळोधी बिटचे क्षेत्र सहाय्यक कार्तिक गडदे वनरक्षक एस. बी. पेंडम यांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर कॅमेरे बसवले आहेत. त्यानंतर हल्ला करणाऱ्या वाघाची सविस्तर माहिती मिळेल. ताडोबा अभयारण्यातून बाहेर आलेली काही वाघाची पिल्ले सिंदेवाही, तळोधी परिसरात फिरताना दिसतात. ताडोबा येथील नर वाघानेही याच परिसरात काही दिवसांपूर्वी एका बैलाला ठार केले होते. त्याचा फोटो कॅमेऱ्यात आल्याने हा वाघ चंद्रपूर ताडोबाचा असल्याची माहिती मिळाली. या हल्ल्यातही असेच घडणे अपेक्षित आहे.

सदर महिलेस १ मुलगा, १ मुलगी, असून तीच या घरची कर्ता असल्याने मुले पोरके झाले आहेत. त्यांचे वडील काही वर्षापूर्वीच मरण पावले होते.

वनविभागाणे कॅमेरे लावून काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे ? ठराविक उपाययोजना करणे आवश्यक असतांना मात्र वनविभाग कॅमेरे लावण्यात व्यस्त आहे , त्याने माणसांचे जीव वाचणार आहेत काय ? कॅमेरे लावून वाघाची सविस्तर माहिती हि वनविभागाने आपल्याजवळ ठेवावी , वनविभागाने लोकांचे जीव कशे वाचू सहकतील यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे .