आमदार प्रतापराव अडसड यांची कर्करोगग्रस्तास मदत

धामणगाव रेल्वे
आमदार प्रतापराव अडसड यांच्या साहाय्याने एका कर्करोग रुग्णास मुंबईमध्ये उपचार मिळाले आहेत , स्वतः आमदार प्रताप अडसड हे त्या रुग्णास घेऊन मुंबईत दाखल.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एका गावात नाश्त्याची गाडी चालवून आपला संसाराचा गाडा चालवीत असलेल्या ३५ वर्षीय युवकास कर्करोगाचे निदान झाले , नागपूर येथे खाजगी उपचारात जवळची शिल्लक संपली , आराम झाला नाही आणि पुढील उपचारास पैशे नाही म्हणून दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला
सदर बाब आमदार प्रतापराव अडसड यांना समजताच रुग्णाचे घर गाठून त्या कर्करोगग्रस्त रुग्णास रुग्णसेवक रोशन गवई यांचेसोबत मुंबईला हिंदुजा हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले , त्याला निशुल्क उपचार उपलब्ध करून दिले.