गडचांदूर भोईगाव महामार्गावरती लाखो रुपयाचा अवैध कोळसा जप्त दोन इसमावर गुन्हे दाखल

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

गडचांदूर एसडीपीओ ची धडक कारवाई

नांदा फाटा, दि. १२/१२/२०२२ 

कोरपणा तालुका हा विविध खनिज संपत्तीने नटलेला असून याच तालुक्यामध्ये अल्ट्राटेक मुरली ऍग्रो माणिकगड अंबुजा असे नारूपास आलेले सिमेंट कारखाने दिमाखाने उभे आहे या ठिकाणी सिमेंट बनवीत असताना कच्चा माल म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये दगडी कोळशाचा वापर केला जातो शिवाय याच परिसरामध्ये अनेक लहान-मोठे लघुउद्योग सुद्धा दगडी कोळशाच्या आधारावर चालणारे स्थापन झाल्याचे चित्र आहे शिवाय अलीकडे तर या तालुक्याची ओळख काड्या सोन्याची जननी म्हणून आहे वेस्टर्न कोल्डफिल्ड लिमिटेड निम्न पैनगंगा क्षेत्र सास्ती पुलगाव विरूर गाडेगाव गौरी पवनी ओपन कास्ट अशा अनेक नाव रूपात आलेल्या दगडी कोळशाच्या खाणी परिसरात विखुरलेले आहे पैनगंगा नदीच्या संपूर्ण किनारी प्रदेशामध्ये दगडी कोळशाच्या खाणीत खाणी असल्यामुळे या सर्व गोष्टीचा फायदा दगडी कोळशाचा अवैध धंदा करणाऱ्या बड्या व्यापाऱ्यांनी घ्यायची सुरुवात केल्याची कोण कोण मागील अनेक दिवसापासून तालुक्यामध्ये सुरू होती गडचांदूर भोयेगाव या महामार्गाच्या कडेला अनेक बड्या अवैद्य व्यवसायिकांनी आपले बसताना मांडले यामध्ये भंगारच्या दुकानाचे चित्र उघड उघड दाखवायचे व मागच्या दारांनी दिवसागणिक हजारो टन कोळसा विकायचा हे सत्र सुरू असताना  गडचांदूर चे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नाईक यांनी सापळा रचून भुईगाव कवठाळा परिसरात सुरू असलेल्या अवैद्य कोळसाच्या साठा असलेल्या ठिकाणावरती छापा मारीत 25 ते 30 टन अवैद्य कोळसा जप्त केला व सदरचा धंदा सांभाळत असलेल्या दोन व्यक्तीविरुद्ध फारुख शेख चंद्रपूर व इतर एक यांच्या वरती भारतीय दंड संहिता कलम क्रमांक 389 या कलमे खाली अटक करण्यात आलेली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नाईक यांच्या नेतृत्वात गटचांदूरचे ठाणेदार सत्यजित आमले पोलीस उपनिरीक्षक प्रमोद शिंदे व त्यांचे सहकारी करीत असून सदरच्या कारवाईने जिल्हा भरातील अवैद्य कोळसाच्या धंदा करणाऱ्या व्यापाऱ्यांचे व धंदेवाल्यांचे यामध्ये अनेक राजकीय व प्रशासकीय मंडळी गुंतले असल्याचे चर्चा परिसरात सुरू आहे आता पोलीस प्रशासकीय यंत्रणा तपासाची सुई कोणत्या दिशेने वळवते व कोण कोणते मासे पोलिसांच्या गडाला लागतात याकडे सर्व तालुका वाशियांचे लक्ष लागलेले आहे