आदिवासी विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापकाची खरेदी केंद्र बोरी येथे सदिच्छा भेट

श्री.अनिल गुरनुले,अहेरी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर  

बोरी/लगाम,दि. १२/१२/२०२२

आदिवासी विकास महामंडळ नाशिक येथील महाव्यवस्थापक (प्रशासन)श्री जालिंदर आभाडे व महाव्यवस्थापक ( विपणन)श्री. जयराम राठोड यांनी खरेदी केंद्र बोरी येथे सदिच्छा भेट दिली. भेटी दरम्यान खरेदी केंद्र बाबतचे संपूर्ण रेकॉर्ड ची तपासणी केली, व शेतकऱ्या सोबत चर्चा करत धान चुकायाबाबत विचारणा केली. शेतक-यांना धानाचे चुकारे वेडीच अदा करावे. धान चुकारे करताना विलंब होता कामा नये. याबाबतचे अधिका-यांना स्पष्ट सूचना दिल्या यावेळी अहेरी येथील उपप्रादेशिक व्यवस्थापक श्री बरकमकर व कक्ष सहाय्यक सुनील उईके गोदामपाल विपणन निरीक्षक तलांडे व संस्था सचिव गुरनुले सागर गड्डमवार, उमेश डोंगरे हे उपस्थित होते.