श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
सास्ती, दि. १३/१२/२०२२
नुकतीच भद्रावती येथे दिनांक 11/12/022 रोजी महाराष्ट्र/तेलंगणा खुली कराटे स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेमध्ये दोन्ही राज्यांतील अनेक कराटे पटुंनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये राजूरा येथील मास्टर प्रकाश पचारे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे प्रशिक्षण घेऊन कराटेपटुंनी घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेमध्ये मुलांमधून प्रथमेश प्रकाश पचारे, ओम चुंबले, चैतन्य रागीट यांना सुवर्ण पदक, तर चैतन्य जेनेकर, पारस पचारे हे कास्य पदाचे मानकरी ठरले. आणि मुलींमध्ये तक्षु कडुकर, प्रगती जेनेकर यांना सुवर्णपदक, आराध्या चौधरी हिला रजतपदक, तन्वी सुनिल रामटेके, अनवी बु॒-हाण हे कास्यपदाचे मानकरी ठरले.
या सर्व विजयी स्पर्धकांनी आपल्या यशाचे श्रेय कराटे प्रशिक्षक प्रकाश पचारे व आई वडिलांना दिले. सर्व विजयी स्पर्धकांचे राजूरा शहर व तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.