श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
ब्रम्हपुरी,दि.१३/१२/२०२२
मित्र हा रक्ताच्या नात्यापेक्षा अतुट नाता आहे.कोणत्याही क्षणी मदतिला धावुन येणारा हा एक मित्रच असतो.अशाच ब्रम्हपुरी येथिल लोकमान्य टिळक विद्यालयात १९९१- ९२ ला दहावी ला शिकत असलेल्या वर्गमित्रांचा तब्बल तीस वर्षानंतर स्नेहमिलन सोहळा व गप्पा गोष्टिंनी मैफिल नुकतिच स्थानिक मालन रेस्टारेंट येथे रंगली.
ब्रम्हपुरी येथिल गुरुदेव वांढरे यांना जुन्या वर्गमित्रांचा स्नेहमिलन सोहळा आपण आयोजित करावा अशी संकल्पना डोक्यात आली. त्यांच्या संकल्पनेला होकार देत सर्वांनी एकत्र मिळण्याचे ठरविले. व त्याप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला याना वर्ग ५ ते १० पर्यंत शिकवित असलेल्या सर्व शिक्षकवृंदाना आमंत्रित करण्यात आले. व सर्व शिक्षकवृदांचा शाल, श्रीफळ व रोपटे देवुन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन अरुणराव कहारे तर मार्गदर्शक म्हणुन शाम झाडे होते. कार्यक्रमाला सेवानिरुत्त शिनखेडे, बुरांडे, उदासी, देव ,चौरिकर, रामटेके, डोर्लीकर, नानोटि, भाई, वानखेडे, सोनकुसरे शिक्षकवृंदानी उपस्थिती होती. सर्व शिक्षकवृंदानी उत्कृष्ट आयोजनाबद्दल काैतुक केले. याप्रसंगी मारिया वांढरे हिने सुंदर विचार प्रकट केले.
कार्यक्रमाचे संचालन विजय सोनकुसरे यांनी तर प्रास्ताविक प्रमोद दिघोरे, स्वागत क्षितिजा सोनकुसरे हिने केले. स्वागत गित समिधा दहिकर, मारिया वांढरे, विद्या पडोळे ह्यानी म्हटले.आभार प्रदर्शन सुनिल कुत्तरमारे यांनि केले.
कार्यक्रमाला गरुडेश्वर पडोळे, पंकज काळबांधे, सिद्धेश्वर भर्रे, मनोज गोन्नाडे, कृष्णा दहिकर, अजय निपाने, पुरु दोनाडकर, सुशिल देव, लोमेश मेश्राम, सुभाष तोंडरे, विनोद हाटकर या सर्वच मित्रमंडळिने सहकार्य केले.