श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
दुर्गापूर,दि. १३/१२/२०२२
दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या अगदी जवळ असलेल्या ग्राम पंचायत उर्जानगर भवनात आरोपी प्रथमेष वाढई, वय २१ वर्ष याने विकास गणविर वय ४७ वर्ष यांचा धारधार शस्त्राने गळा चिरून हत्या केली.
विकास गणवीर यांची मुलगी आरोपींवर प्रेम करत होती मात्र वडील अडसर येत असल्याने आरोपीनी प्रेयसीच्या वडीलाचाच काटा चक्क गळाच चिरून काढला . हत्येपूर्वी आरोपीने विकास गणवीर यांना घरातून बोलावून नेले व बाचाबाची झाल्यानंतर आरोपीने हत्या केल्याचे बोलल्या जात आहे. #prathamesh wadhai
murder of girlfriends father At chnadrapur
घटनेच्या एक दिवसांपूर्वी आरोपी प्रथमेश याने मृतका विकास गणवीर यांचे री कुऱ्हाड घेऊन मारण्यासाठी गेला असता मात्र वेळीच पोलीसांनी आरोपीच्या हातातून कुऱ्हाड घेऊन प्रकरण शांत केले.पण आरोपीची मनातील दगदग शांत झाली नव्हती त्यामुळे आज त्याचा वचपा काढल्याची चर्चा आहे. मागील महिन्यात सुद्धा हत्याकांड घडले असून त्याच दहशतीतून दुर्गापूर वासीय बाहेर पडले नाहीत तोच आज पुन्हा हत्या झाली , हि हत्या दुर्गापूर पोलीस स्टेशन च्या काही अंतरावर घडली हे विशेष.