श्री.विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
देसाईगंज,दि.२३/१२/२०२२
देसाईगंज शहरात अवैद्य व्यवसायात स्मशान शांतता पसरली असली तरी काही भुरटे व्यवसाईक लपुन छपुन सट्टा चालवित असल्याची चाहुल लागताच काल सायंकाळचे सुमारास दोन सट्टा व्यवसायीकांना जेरबंद करुन देसाईगंज पोलिसांनी अवैद्य व्यवसायीकांवर पुन्हा लगाम कसली आहे सविस्तर वृत्त असे की मागिल काहि दिवसांपासुन देसाईगंज पोलीसांनी शहरात व संपुर्ण तालुक्यात अवैद्य व्यवसायाला प्रतिबंध घालण्यासाठी युद्ध स्तरावर मोर्चेबांधणी सुरु केली यात मातब्बर दारु #two gambler arrested by desaiganj police व्यवसायीकांसह सट्टा व्यवसायीकांना पोलिसी हिसका दाखविल्याने या अवैद्य व्यवसायीकांचे चांगलेच धाबे दणानले माञ काही लहाण व्यवसायीक संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असतांना देसाईगंज पोलीस भरारी पथकाचे प्रमुख पो उप निरिक्षक ज्ञानेश्वर लांडे यांनी आपल्या सहकार्यांसह देसाईगंज च्या भगतसिंग वार्डातिल शांताराम गोर्लावार व नैनपुर वार्डातिल भारत गराडे या दोन सट्टा व्यवसायीकांना जेरबंद केले, देसाईगंज चे पोलिस निरिक्षक महेश मेश्राम यांचे नेतृत्वात अवैद्य व्यवसायीकांना जेरबंद करण्याची मोहिम मागिल काही महिण्यांपासुन युद्ध पातळीवर सुरु असुन या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी पो उप निरिक्षक ज्ञानेश्वर लांडे, युनुस ईनामदार, म.पो.उपनिरिक्षक सुजाता भोपडे, पो.शि. श्रिकृष्ण जुवारे व संपुर्ण पोलिस कर्मचारी कसोसीचे प्रयत्न करित आहेत.