दोन दुचाकी स्वारांचा मृत्यू

Mul Accident Borchandali road, St bus with motorcycle, two Death

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर 

चंद्रपुर ,दि.१३/०२/२०२३

एस टी महामंडळाची बस उलटत असताना त्याखाली एक दुचाकी आल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सोमवारी सकाळी मूल तालुक्यातील बोरचंदली नदीजवळ घडली. Terrible Accident संदीप रामदास कोकोडे वय 28 वर्षे व प्रफुल उर्फ भाऊराव गुरनुले वय 24 वर्षे असे मृत्तकाचे नांव आहे.

मूल फिस्कुटी येथील संदीप रामदास कोकोडे वय 28 वर्षे व प्रफुल उर्फ भाऊराव गुरनुले वय 24 वर्षे हे एम एच 34 सी ए 3704 या दुचाकी ने मूल येथील राईस मिल येथे जात असताना एसटी परिवहन विभागाच्या बस क्रं. एम एच 07 सी 9158 ही मूल वरून चामोर्शीला जात असताना नदीजवळ पलटी झाल्याने त्या बसखाली येथुन दोघेही ठार झाल्याची घटना घडली.

घटनास्थळावर मूल पोलीस पोहचुन शवउत्तरीय तपासणीसाठी मूल उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.

Mul Police Station पुढील तपास मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. newsjagar