लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने मोटार सायकलस्वार चिरडले

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

गडचिरोली,दि.१३/०२/२०२३

एटापल्ली येथून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने मोटार सायकलस्वार चिरडल्याने युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दि.१२/०२/२०२३  सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास गडचिरोली-सेमाना मार्गावर घडली. चेतन विस्तारी पोत्रोजवार रा. काटली, असे मृत युवकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, रविवारी दुपारच्या सुमारास गडचिरोली शहरानजीकच्या चामोर्शी मार्गावरील सेमाना देवस्थान येथे एका कार्यक्रमासाठी चेतन पोत्रोजवार हा गेला होता. कार्यक्रम आटोपून गडचिरोलीकडे परत येत असताना समोरुन येणाऱ्या ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. घटनेची माहिती गडचिरोली पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. अधिक तपास गडचिरोली पोलिस करीत