चामोर्शी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
चामोर्शी,दि.१२/०२/२०२३
राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तालुका आरोग्य विभागाचे वतीने १० फरवरी ते २० फरवरी या कालावधीत हत्तीरोग दुरीकरण मोहीम राबवली जाणाऱ्या या मोहिमेचा शुभारंभ १० फरवरी रोजी येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला , या कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार डॉ देवराव होळी, यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कुणाल मोडक, गडचिरोली फायलेरिया अधिकारी डॉ, महेंद्र देवळीकर ,. तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रफुल हुलके, उपस्थित होते.
यावेळी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी आमदार डॉ देवराव होळी यांनी हत्तीरोग रोग हा घातक असा रोग आहे याचे शारीरिक व मानसिक दुष्परिणाम होतात यावर वेळीच उपचार केले नाही तर संबधित व्यक्तीचे आयुक्ष निररर्थक बनते यासाठी हत्तीरोग उच्याटन करण्यासाठी आरोग्य विभागाला सर्वांनी सहकार्य करत या मोहिमेत सहभागी व्हा असे आवाहन केले,
या कार्यक्रमाचे संचालन गोविंद कडस्कर, आभार वितराज कुंनघाडकरयांनी मानले यावेळी आरोग्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
तालुक्यात १९९ असून घोट, रेगडी, आमगाव महाल, भेंडाळा, कोंनसरी, मार्कडा कंसोबा या सात प्राथमिक आरोग्य केंद्रातील ५३ उपकेंद्र मधील पात्र असलेल्या ०१ लाख ६२ हजार १२२ लाभार्थ्यांना गोळ्याचे वाटप होणारअसून दोन वर्षांवरील बालके, गरोधर माता, दुर्धर आजारी असलेल्या हत्तीरोग गोळ्या सेवन करता येणार नसल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रफुल हुलके यांनी मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी दिली