लेखा ते गोडलवाही मार्गावर झालेल्या अपघातात दोघेजण जखमी

dhanora Lekha Accident

धानोरा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर

धानोरा,दि.१३/०२/२०२३

धानोरा तालुक्यातील लेखा ते गोडलवाही मार्गावर मामा तलावाच्या वळण केंद्रावर रविवार 12 फेब्रुवारी रोजी 4 वाजताच्या सुमारास चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने या अपघातात दोघेजण जखमी झाले. लचमन राणू पोटावी (62), दामा पदा (55) दोघेही रा. गोडलवाही असे अपघातात जखमींची नावे असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

एमएच 49 बि 0605 या क्रमांकाचे चारचाकी वाहन गोडलवाही वरुन लेखा मार्गाने येत होती तर दुचाकी वाहन लेखाकडून गोडलवाही कडे जात होते. दरम्यान मामा तलावाच्या वळण केंद्रावर चारचाकी वाहनाने दुचाकी वाहनास जबर धडक दिली यात दोघेजण गंभीररीत्या जखमी झाले असून जखमींना धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता भरती करून प्राथमिक उपचार करुन गडचिरोली येथे रेफर करण्यात आले आहे . Newsjagar