श्री.अरुण बारसागडे,चनद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
सावरगाव,दि.२४/०२/२०२३
नागभीड तालुक्यातील वलनी येथील अनिल हरी गेडाम (40) यांनी आपल्या राहते घरी 1/18 च्या पिवढ्या वायरने पंख्याला लटकून आत्महत्या केली. अनिल गेडाम सावरगाव साजा क्रमांक 23 येते कोतवाल पदावर कार्यरत होते. पत्नी बाहेरगावाला कामानिमित्त गेली होती व मुले शिक्षणाकरिता बाहेरगावला राहत असल्याने घरी एकटाच रहायचा त्यामुळे त्याला दारूचे व्यसन होते व तो कौटुंबिक विवेचनेत जगत होता त्यातूनच त्याने आत्महत्या केली असावी अशी शंका व्यक्त केल्या जात आहे. आत्महत्येचे खरे कारण अजून कळले नाही, प्रेताला पोस्टमार्टम करण्याकरिता नागभीड येथे नेण्यात आले असून आत्महत्येचा पुढील तपास ठाणेदार शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुधाकर भांनारकर, मनीष गेडाम करीत आहेत.newsjagar