श्री.नंदकिशोर वैरागडे,विशेष प्रतिनिधी गडचिरोली जिल्हा,न्यूज जागर
कोरची,दि.२६/०२/२०२३
जखमी हमालाला कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात रेफर
तालुका मुख्यालयापासून 10 किमी अंतरावरील ढोलीगोठा – नाडेकल रस्त्यावर गिटटी टाकून परतीच्या प्रवासात असलेल्या ट्रॅक्टर चालक व हमालाला पुराडा वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांच्या चमूने बेदम मारहाण केल्याची घटना बेडगाव पोलीस मदत केंद्रच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता घडली असून गंभीर जखमी असलेल्या हमालाचे मयाराम ताळामी 40 बेडगाल असे नाव आहे, tractor labour & driver beaten by forest officer
कोरची- कुरखेडा राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या ढोलीगोटा – नाडेकल या नवीन रस्त्याचे काम कोरची येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत लक्ष्मी ट्रेडर्स कंपनी नागपूरच्या नावे काम सुरू असून पाचगाव( नागपूर) वरुन बेडगाव येथे आणून साठवून ठेवण्यात आलेल्या ठिकाणावरून एम एच 34 बी एफ 6880 या ट्रॅक्टरने गिट्टी वाहतूक करून परतीच्या मार्गावर असताना पुराडा वनपरिक्षेत्र अधिकारी दिघोरे, क्षेत्र सहायक बबलू टोकलवार व वनरक्षक गावड यांनी ट्रॅक्टर थांबवून जातीवाचक शिव्या देऊन कसल्याही प्रकारची विचारपूस न करता ड्रायव्हर राजेंद्र वरखडे व मयाराम ताळामी 40 यांना बेधम मारहाण केली व दोघांनाही बेडगाव वनपरिक्षेत्र कार्यालयात आणून कोऱ्या कागदावरती सह्या घेऊन सोडून दिले. पण ट्रॅक्टर मध्ये अवैध गिट्टी नसल्याने मयाराम तारामी यांना गंभीर जखम झाल्याने त्यांनी पोलीसांनी स्टेशन गाठून रात्री आठ वाजता तोंडी तक्रार नोंदवली. नंतर पोलिसांनी कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण बांबूच्या काठ्यांनी अधिकारी लोकांनी मारहाण केल्यामुळे गंभीर दुखापत असल्यामुळे कोरची ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कुरखेडा येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी रेफर करण्यात आलेले आहे.newsjagar
यावर पुराडा वनपरिक्षेत्र अधिकारी दिघोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मारहाण केली नाही आहे असे सांगितले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे