श्री.अरुण बारसागडे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
नागभीड तालुक्यातील मिंडाळा वनपरिक्षेञातील घटना.
Newsjagar
नागभीड तालुक्यातील मिंडाळा वनपरिक्षेञात येत असलेल्या मांगली बिटात वाघाच्या हल्ल्यात एख इसम ठार झाल्याची घटना घडली आहे.सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे कि,म्हसली येथिल रहीवासी असलेला किशोर दादाजी वाघमारे (३२) हा व्यक्ती मांगली बिटाला लागुन असलेल्या आपल्या शेता मध्ये शनिवारला चार वाजताच्या सुमारात स्वतःचे गुरे चराई साठी गेला होता. त्याचवेळेत शेतातच दबा धरुन असलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला करुन ठार केले. सांयकाळी किशोर घरी न आल्याने घरच्यांनी त्याची सर्वत्र शोधा-शोध केली पण त्याचा पत्ता लागला नाही.त्यानंतर ही माहीती नागभीड वनपरिक्षेञ कार्यालयाला देण्यात आली.वन कर्मचाऱ्यांनी राञो किशोरचा शोध घेतला पण तो सापडला नाही. रविवारला सकाळी मांगली बिटात कक्ष क्रमांक ६३१ येथे त्याचे वाघाने खाललेल्या अवस्थेत मृतदेहच सापडले. या घटने विषयी परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.त्याच्या अत्यंसस्कारा साठी २० हजार रुपयाची आर्थीक मदत देण्यात आली. या परीसरात ही पाचवी घटना आहे. त्या नरभक्षक वाघाचा लवकर बंदोबस्त करा अशी मागणी करण्यात येत आहे.man dead in tiger attack at mangali beat