चंद्रपूर येथे पाण्याच्या टाकीत एका व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह

Deadbody-in-watertank
Deadbody-in-watertank

श्री. अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

चंद्रपूर,दि.०८/०३/२०२३

पाणीपुरवठा केंद्राचे कंत्राटदार लोकांच्या जिवाशी कसे खेळत आहेत, याचा पुरावा शहरात दिसून आला. पाण्याच्या टाकीत एका व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. मृतक हा  ठेकेदाराने नेमलेला कामगार आहे कि नेमका कोण आहे ? हे कळू शकलेले नाही. मात्र ज्यांच्या घरात टाकीतून पाणी पोहोचले आहे त्यांच्यासाठी ही घटना जीवघेणी आहे. newsjagar 
महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या जलजीवनातील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या रामनगर येथील जलशुद्धीकरण केंद्रात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. ही घटना रविवारी उघडकीस आली. हे जलशुद्धीकरण केंद्र महाराष्ट्र जल प्राधिकरणाच्या अखत्यारीत असून ते कंत्राटी पद्धतीने चालवले जाते. येथे काही कामगार कंत्राटी पद्धतीने काम करतात. dead body found in water tank

येथे जलशुद्धीकरण केंद्राच्या पाण्याच्या टाकीजवळ एका 30-35 वर्षीय तरुणाचा कुजलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मृताच्या खिशातून रेल्वे तिकीट सापडले आहे.

मृतक जलशुद्धीकरण टाकीपर्यंत पोहोचला कसा आणि त्याचा मृत्यू कसा झाला हा प्रश्न कायम आहे. जलशुद्धीकरणाचे देखभाल दुरुस्तीचे काम खासगी कंत्राटदाराने नेमलेल्या कंत्राटी कामगारांकडून केले जाते. असे असताना सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट होत आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.