श्री.भुवन भोंदे,प्रतिनिधी,वडसा ,न्युज जागर
देसाईगंज,दि. १४/०५/२०२३
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ऐतिहासिक विजय मिळाले असून पुढल्या वर्षी सुद्धा महाराष्ट्रात हेच चित्र दिसणार हे स्पष्ट झाले आहे. वाढत चाललेली गॅस, पेट्रोल, डिझेल चे भाव वाढती महागाई, बेरोजगारी, केंद्र आणि राज्य सरकारचे भ्रष्टाचार या सर्व गोष्टींना कंटाळून युवक, महिला, शेतकरी व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांनी कर्नाटक निवडणुकीत मतदान केले आणि भ्रष्टाचारी भाजपला हद्दपार केले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोरोना काळात सुद्धा उत्कृष्ट काम करत असतांना देखील भाजप ने धनशक्तीच्या जोरावर सत्ता बदल केले. त्यामुळे जनतेत भाजप प्रति रोष आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यातील आणि जिल्ह्यातील जनता भाजपच्या जातीय तेढ आणि धार्मिक राजकारणच्या मुद्याला दूर ठेवून, महागाई- बेरोजगारी सारख्या मुद्द्यांना घेऊन भाजपच्या खोटे आश्वासनांना बळी न पडता मतदान करनार व राज्यातून आणि जिल्ह्यातून भाजपला हद्दपार करनार. भाजपची आता उलटी गिनती सुरू झालेली आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांना धडा शिकवल्या शिवाय जनता शांत बसणार नाहीत.असे मत ओबीसी काँग्रेस कमिटी चे जिल्हा सचिव मनोज ढोरे यांनी व्यक्त केला.