निर्व्यसनी , चारीञ्यशील, स्वावलंबी समाज घडवा – केंद्रीय सरचिटनिस अशोकजी सब्बन

श्री.भुवन भोदे, प्रतिनिधी,न्यूज जागर
देसाईगंज,दि. १६/०५/२०२३
आदर्श गाव निर्मीती करीता ग्रामसभा प्रशिक्षणाची गरज
शेकडो नागरीकांच्या उपस्थीतीत मार्गदर्शन शिबीर संपन्न

 

मौजा देसाईगंज वडसा येथे पद्मभुषन अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोघी जन आंदोलन न्यास तथा अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने सर्वसामान्य जनतेच्या हिता करीता अण्णा हजारेच्या आंदोलनातुन प्राप्त झालेले ग्रामसभा,दप्तर दिरंगाई, नागरीकाची सनद,माहितीचे अधिकार,रेशनिंग व्यवस्था,यावर रविवार दिनांक १४/०५/२०२३ ला संत शिरोमणी गजानन महाराज सभाग्रुहात एक दिवशिय कार्यशाळा तथा भव्य मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले.
या वेळी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाचे केंद्रीय सरचिटनिस अशोकजी सब्बन यांनी मुख्य मार्गदर्शन करताना म्हणाले की ग्रामसभा ही लोकसभा व राज्यसभेची जणनी आहे व ती स्वयंभु आहे.शासन,प्रशासना कडुन ग्रामपातळीवर राबविण्यात येणारे एकुण योजना पारदर्शीपणे राबविण्या करीता सक्षम ग्रामसभेची गरज आहे. अन्यथा ग्रामपंचायती मध्ये निय्यमबाह्यता व गैरकारभार झाल्या वाचुन राहणार नाही.तसेच अनेक गावातील ग्रामस्थाना ग्रामसभा कळत नाही.जर का गावहिता ठराव ग्रामसभा घेत असेल तर त्याला सर्वेच्च न्यायालय अमान्य करु शकत नाही.एवढे ज्यादा अधिकार दिलेले आहेत. असे असता अनेक ग्रामस्थ गाव विकासा पासुन वंचित राहीले.मणुष्य,जनावरे,पशुपक्षी यांचे मुलभुत गरजा पुर्ण करुन गावातील शिक्षण, आरोग्य,जलसिंचन,शेती,बांधकाम ,रोजगार,वीज या बाबीकडे ग्रामसभेच्या माध्यमातुन ग्रामस्थाना लक्ष देण्याची गरज आहे. व गावाच्या हिताचे सर्वानुमत्ते निर्णय घेऊन तसा ठराव पारीत करावा.महीलांच्या उन्नतीकडे लक्ष द्यावे. सक्षम ग्रामसभे करीता ग्रामस्थाना ग्रामसभेच्या प्रशिक्षणाची नितांत गरज आहे.जर गावागावातील ग्रामसभा मजबुत व सक्षम झाल्यास आदर्श गाव निर्माण करु शकतो.असे मत मार्गदर्शनातुन भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाचे केंद्रीय सरचिटनिस अशोकजी सब्बन यानी व्यक्त केले..या नंतर भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाचे केंद्रीय उपाध्यक्ष से.नि.प्राचार्य बालाजी कोंपलवार म्हणाले की, स्वातंञ्या नंतर या देशाची जनता मालक झाली त्याच क्षणी लोकशाही देशात नांदु लागली.लोकशाहीचे दोन भाग पडले एक शासन व दुसरा प्रशासन शासनकर्ते जनतेतुन निवडुन दिलेले लोक प्रतिनिधी हे जनतेचे विश्वस्त आहेत तर मतदार राजा आहे. तेव्हा नागरीकाना नागरीकाची सनद कळायला हवी.व प्रत्येक प्रशासकीय कार्यालयात त्याचे पालन झाले पाहीजे.दप्तर दिरंगाईच्या कायद्यामध्ये कार्यालयीन कामकाजात एका टेबल वरुन दुस-या टेबल वर फाईल सात दिवसात सरकणे गरजेचे आहे.यात दिरंगाई झाल्यास सबंधीत वरीष्ट अधिकारी कारणे दाखवा नोटीस बजावेल व य़ात दप्तर दिरंगाई करणा-या कर्मचारी,अधिकारी यांचेवर शास्तीच्या कार्यवाहीची तरतुद आहे. तेव्हा प्रत्येक नागरीकांना दप्तर दिरंगाई कायद्याची माहिती असायला हवी असेही ते बोलत होते,त्या नंतर कार्यक्रमात पेसा ग्रामसभा,नागरीकाची सनद, सार्वजनिक रेशनिंग व्यवस्था यावर मान्यवराचे मार्गदर्शन झाले.

या कार्यक्रमाला गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजयजी मिना शासनाचे प्रतिनिधी निवाजी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे यांना त्यानी कायदेविषय व योजणांची माहिती दिली.व प्रत्यक्ष जिल्हाधिकारी यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिले.कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवक डाँ.देवाजी तोफा,राज्य समिती विश्वस्त डॉ.शिवनाथ कुंभारे,इंजीनियरींग कालेजच्या प्राध्यापिका विशाखा सरणे ,जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनीही मार्गदर्शन केले.कार्यक्रमात ,विठ्ठलजी बदखल,सुबोध दादा,मोतीलाल जेठानी,श्रीमती प्रभाताई ढोरे,पुंडलिक नागपूरकर,अर्पना राऊत,दिपक बारसागडे,रक्षित पोटवार,ग्रामसेवाधिकारी सुखदेवजी वेठे,पंडीतजी पुडके,यशवंत मडावी,बाळासाहेब सुखदेवे,चरणदास बोरकुटे,महीला अध्यक्ष ज्योतीताई कोमलवार,भाऊरावजी पञे, संतोषजी दुपारे ,नाणाजी ठाकरे,रामक्रुष्ण सहारे,प्रभाकर सुर्यवंशी,धनपालजी कार,ञ्यंबकजी भजणे,क्रिष्णा झंजाळ,मनोज,मशाखेञी, दयाराम बन्सोड,रुपराज लांजेवार,सोमेश्वर नाकाडे,शामजी कुथे,सारंग बेहरे,आन्दराव दुपारे,सारीका कुर्जेकर,शालुताई धोटे,रेखाताई बुल्ले,मिनाक्षी ढोंगे,स्नेहा दोनाडकर,भाग्यश्री सेलोकर,सुरेखा रहाटे,रत्नप्रभा ढोंगे,रामभाऊ कुर्जेकर,रामभाऊ धोटे,दादाजी खरकाटे ,संजय प्रधान,देवराव फाये,साधोजी राऊत,बबन सिल्लार,लक्षमणजी मांडवे,हरीजी पिल्लारे,यशवंत बगमारे,गुणवंत सय्याम,घनशाम ढोंगे,नाणाजी खुणे,पुंडलीक नेवारे,रेखाताई रासेकर,श्रीहरी गायकवाड,भाऊरावजी बानबले,दिनकर भोयर,घनशाम मडावी,धर्मेन्द्र परीहार,अनिता पारधी,रत्नमाला सहारे, ज्योती धावडे,मिनाताई कराडे,यादव खोब्रागडे,वामन सेलोटकर,दादाजी खरकाटे,माधुरी सुरपाम,गुणवंत सय्याम,विठ्ठल ढोरे,राहुल मेश्राम,नकुल सहारे,लालाजी बुरले, भाष्कर चौधरी,जेंगठे,,भगवान खोब्रागडे,भागवत मारगावे,शालुताई मैद,राहुल वासनिक,दिगांबर बुले,चरणदास कवाडकर,बबन सिल्लार,जयप्रकाश हर्षे,कृष्णा काळबांधे, ठोंबरे,रविन्द्र दोनाडकर, रामक्रिष्ण धोटे,अहेरीच्या माजी नगराध्यक्ष हर्षाताई ठाकरे,देसाईगंज,शुभम खरवडे,संगीता हर्षे,दिनेशजी कुर्जेकर,योगेन्द्र झंजाळ,कृष्णा धानफोले,इत्यादींची उपस्थिती होती .

सदर कार्यक्रमात परीसरातली महीला,पुरुष यासह शेकडो नागरीक ग्रामस्थ उपस्थीत होते.कार्यक्रमाच्या सुरवातीस महापुरुषाच्या प्रतिमेस दिपप्रज्वलन व माल्यार्पन करुन करण्यात आले सर्व उपस्थीतांचे स्वागत गित व कथक डान्सने लक्ष वेधले कोरेगाव येथील विविध आभुषना सहीत दिंडी भजन रँली काढण्यात आले.तर कार्यक्रमा स्थळी कुरखेडा येथील गुरुदेव भजन मंडळीनी अध्यात्मिक वातावरनाची निर्मिती केली.कार्यक्रमात सामाजीक क्षेञात उलेखनिय महान कार्य करणा-या आलापल्लीे येथील स्वराज्य फाऊँडेशन यांचे सन्मानपञ व शिल्ड देऊन सन्मान करणात आले.तसेच ईत्तर मान्यवराना सन्मानित करण्यात आल.कार्यक्माच्या यशस्वीते करीता,स्ञी शक्ती संघटना वघाळा,आरमोरी,वासाऴा,जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज श्री संप्रदाय नैनपुर,निखीलेश्वर भजन मंडऴ सावंगी,अखिल भारतीयश्री गुरुदेव सेवा मंडळ,टायगर ग्रुप वडसा,तथा विविध सामाजीक संघटनेनी सहकार्य केलं. कार्यक्रमाचे उदघाटन निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे तर अध्यक्ष जेष्ट समाजसेवक देवाजा तोफा होते. कार्यक्रमाचे सुञ संचालन अहेरी येथील राजे धर्मराव विद्यालयाचे हायस्कुलचे शिक्षक रविन्द्र ठाकरे सर यांनी केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी तर आभार धनपाल कार यांनी मानले.सर्वाना भोजणाची व्यवस्थी केलेली होती.newsjagar