गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
देसाईगंज ,दि. १६/०५/२०२३
पत्नीकडे कपडे शिवायला येणाऱ्या महिलांचे कपडे बदलविताना चे चित्रीकरण करणाऱ्या शिक्षकास अटक करण्यात अली असून नंदकिशोर भाऊराव धोटे nandkishor bhaurao dhote (45) रा. कुरखेडा, ह.मु. देसाईगंज असे त्या शिक्षकाचे नाव आहे.
कुरखेडा (kurkheda) तालुक्यातील कार्यरत जि.प. शिक्षक देसाईगंज येथे वास्तव्यास राहत असून त्याची पत्नी शिवणकाम करीत असते त्यामुळे त्याच्या पत्नीकडे घरी महिलांचे येणेजाणे असते , यासाठी १ खोली असून त्यात महिला कपडे बदलवितात, या खोली च्या भिंतीला लहान लहान छिद्रे पडून सदर शिक्षक त्यातून महिलांचे कपडे बदलविताना चे चित्रीकरण मोबाईलद्वारे करीत होता, एका महिलेला हि बाब लक्षात येताच देसाईगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली , शिक्षक नंदकिशोर भाऊराव धोटे (45) याला महिलेच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करून ,ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले . Hidden camera set by zp teacher in changing room at desaiganj wadsa
शिक्षकाच्या या प्रतापामुळे शहरात तसेच जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली असून कार्यवाही काय होणार आता याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.newsjagar