गडचिरोली जिल्ह्या ग्राहक मंच चा पेटीएम ला दणका

चामोर्शी

श्री अमित साखरे उपसंपादक न्यूज जागर

चामोर्शी येथील सेवा निवृत्त प्राचार्य श्री.आनंद ऐलावर यांच्या एस बी आय बॅक खात्यामधून पेटीएम द्वारे कोणत्याही प्रकारची पूर्व सुचना न देता दिं 20/1/2020 ला 43920/- रु.काढून घेण्यात आले, या बाबत त्यांनी दिं 23/1/2020 ला पेटीएम कडे तक्रार केली असता पेटीएम नि आपली चूक मान्य करून त्यांना त्यांची रक्कम लवकरात लवकर त्यांच्या खात्यात जमा करण्याचे वारंवार आश्वासन देत होते पण नेहमीच काही तरी कारण देत रक्कम जमा करण्यासाठी टाळाटाळ करित होते, हि बाब श्री ऐलावर लक्षात आल्यावर त्यांनी दिं 26/7/2021 ला गडचिरोली जिल्ह्या ग्राहक मंच कडे पेटिएम विरुद्ध तक्रार दाखल केली व ग्राहक मंच ने पेटीएम विरुद्ध निर्णय दिला व श्री ऐलावर त्यांची रक्कम 6% व्याजासहित व खर्च 10000 रुपये देण्यात यावा असा आदेश दिं 13/5/ 2022 ला दिला व त्या नुसार पेटीएम कडून 54339 रुपये श्री ऐलावर यांना दिं 8/8/2022ला चेक द्वारे प्राप्त झाले