विशेष प्रतिनिधी न्युज जागर
लोहखनिजाच्या वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या सोडवा अन्यथा चक्काजाम आलापल्ली व्यापारी संघटनेचा ईशारा
सुरजागड प्रकल्पातून लोहखनिजाची होणारी वाहतूक दिवसा बंद करा, ओव्हर लोड वाहतूक बंद करा, मार्ग खड्डेमुक्त करा, वाहतुकीसाठी बायपास मार्गाची निर्मिती करा आदी मागण्यांसाठी आलापल्ली व्यापारी संघटनेकडून अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक अहेरी यांना सोमवारी निवेदन देण्यात आले.
त्रिवेणी अर्थमुव्हर्स कंपनीद्वारे सुरजागड मधील लोह प्रकल्प मधून जडवाहनाने लोहयुक्त दगड, चुरा दररोज ८०० ते १००० जड वाहनाणे एटापल्ली मद्दीगुडम आलापल्ली नागेपल्ली या मार्गावरून वाहतूक सुरु आहे. त्यामध्ये अनेक जड वाहन क्षमतेपेक्षा जास्त माल भरून वाहतूक करीत आहेत. त्यामुळे मद्दीगुडम आलापल्ली नागेपल्ली ते आष्टी पर्यंतचा पूर्ण मार्गावर मोठे मोठे जीवघेणे खड्डे पडलेले आहेत.
या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी ग्रामपंचायत आलापल्ली व नागेपल्ली यांनी ग्रामसभा घेऊन कार्यवाही अहवाल प्रस्ताव दिलेला आहे . तरी त्यानुसार कंपनीकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. तक्रारीच्या दिनांकापासून १० दिवसाच्या आत आलापल्ली ते नागेपल्ली रोड खड्डेमुक्त करण्यात यावी व जड वाहनांची वाहतूक सकाळी ०६:०० ते रात्रो ०९:०० वाजेपर्यंत बंद ठेवण्यात यावे किंवा एक वेगळा गावाबाहेरून बायपास रस्ता तयार करण्यात यावे असे निवेदन संबंधितांना दिले आहे. अन्यथा आलापल्ली / नागेपल्ली सर्व ग्रामस्थ कंपनीचे वाहन वाहतूक होवू देणार नाही. व चक्काजाम आंदोलन करण्यात येईल. असा इशारा आलापल्ली व्यापारी संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात दिला आहे.