रत्नापुर येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 54 वि पुण्यतीथी कार्यक्रम संपन्न

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

 

श्री. गुरुदेव सेवा मंडळ रत्नापुर यांच्या वतीने आयोजन

रत्नापुर 
अख्ख्या विश्वाला मानवतेचा संदेश देणारे मानवतेचे महान पुजारी, खंजिरीचे निर्माते व ग्रामगीतेचे रचनाकार वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 54 वि पुण्यतीथी व समर्थ आडकुजी महाराज यांची 101वी पुण्यतिथी व 201 वी जयंती निमित्त्याने श्री. गुरुदेव सेवा मंडळ रत्नापुर यांच्या वतीने त्यांच्या पावन स्मूर्तीस विनम्र अभिवादन करण्यास दि:6/11/2022 ते 7/11/22 ला दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
पहिल्या दिवशी दि:6/11/22ला घटस्थापना आणि सायंकाळी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
दुसऱ्या दिवशी दि:7/11/22 ला सकाळी 6.30 वाजता सामूहिक ध्यान व लगेच गावामधे रामधुन फेरी ,पालखी काढण्यात आली. या पालखी मधे संपूर्ण गावातील लोकांनी सहभाग घेतला.दुपारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या श्रधंजलि अर्पण कार्यक्रम व सर्वधर्म समभाव प्रार्थना करण्यात आली.

श्री.गुरुदेव सेवा मंडळ रत्नापुर यांच्या वतीने आयोजितआणि श्रीराम भजन मंडळ कार्यक्रमात या श्रद्धजंली कार्यक्रमा मधे अध्यक्ष. रमाकांत लोधे, प्रमुख पाहुने ह.भ.प प्रेमदासजी मेंढूलकर(ग्रामगिताचार्य),ह.भ.पडॉ. राम गभने (ग्रामगिताचार्य),मेघस्याम गहाणे अध्यक्ष श्री.गुरुदेव सेवा मंडळ रत्नापुर, संजय गहाणे, वासुदेव गभने, मंगेश मेश्राम, बालाजी लेन्ज़े, उपस्थित होते.

वंदनीय तुकोडोजी महाराज आणि समर्थ आडकुजी महाराज यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलित व हार अर्पण करून पुण्यस्थिती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राम गभने यांनी केले.या कार्यक्रमाला मार्गदर्शन ह.भ.प प्रेमदासजी मेंढूलकर(ग्रामगिताचार्य),डॉ. राम गभने (ग्रामगिताचार्य), त्यांनी
आपल्या मार्गदर्शनात ग्रामगीता महत्त्व, समाज सेवा व राष्ट्र निर्माण याविषयी मार्गदर्शन केले.
रमाकांत लोधे यांनी जाती-धर्म,तुकोडोजी महाराज यांचे विचार, रूढी परंपरा, व समाज संघटन याविषयी मार्गदर्शन केले. मंगेश मेश्राम यांनी आपल्या मार्गदर्शनात ग्रामगीता महत्त्व, समाज सेवा व राष्ट्र निर्माण याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नामदेव गेडाम, बंडू गभने, प्रकाश उरकुड़े, जगदीश गहाणे, गोपाल झोडे ,माणिक गेडाम त्याचप्रमाणे श्री, गुरुदेव सेवा मंडळचे सर्व सभासद व पधादिकारी आणि गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.सायंकाळी गोपालकाला व महाभोजनाणे कार्यक्रमाची सांगता झाली. या महाभोजनाला गावातील नागरिक उपस्थित होते.