श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ,न्यूज जागर
ब्रम्हपुरी
विद्यानगर प्रभागात आरोग्य शिबीर संपन्न. ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी व नगर परिषदेचे उपाध्यक्ष अशोक रामटेके यांचे सयुक्त विद्यमाने 9 नोव्हेंबरला विद्यानगर प्रभागातील त्रिरत्न बुद्ध विहाराच्या पटांगणात राज्य शासनाच्या “माता सुरक्षित तर घर सुरक्षित “या मोहिमेअंतर्गत आरोग्य शिबीर संपन्न झाले. या शिबिरात एकूण 389 महिलांची तपासणी करण्यात आली त्यामधे 14महिला ह्या उच्च रक्तदाब, 7 महिला मधुमेह व 3 महिलांमध्ये ह्रदयरोग या आजाराचे निदान झाले. तसेच महिलांची कर्करोगाची सुद्धा तपासणी करण्यात आली असून विशेषतः कर्करोगावर मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले. 117 महिलांची पोर्टल एन्ट्री करण्यात आली. सदर शिबीराला नगर परिषदेचे उपाध्यक्ष अशोक रामटेके यांनी जातीने उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. डॉ. ई. एल. रामटेके, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.खरकाटे मॅडम,अन्जिरा आम्बीलढूके,प्राजक्ता फुलझेले (समुपदेशक), सोनाली पानशे इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिती होती. शिबीर यशस्वी करण्यासाठी दिनेश लोखन्डे, नरेन्द्र बान्ते,बौध्दरक्षक जाम्भूळकर, अमरदिप मेश्राम, रवि गणविर, राजेश बोरकर, किशोर रामटेके इत्यादिनी मोलाचे सहकार्य केले.