श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ,न्यूज जागर
आंतरराष्ट्रीय मानव अधिकार कम्यूनिटी भारत च्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष प्रियाताई झांबरे यांनी केली थेट जिल्हाधिकारी कडे तक्रार
बल्लारपुर पेपरमिल मध्ये पर्सनल डिपार्टमेंट च्या अधिकाऱ्यांचा सुरु असलेला भोंगळ कारभार व हुकुमशाही तात्काळ बंद करुन जुन्या कामगारांना त्यांचा हक्क मिळण्याची केली मागणी
बल्लारपुर मागील अनेक वर्षापासुन बल्लारपुर पेपरमिल कंपनी मध्ये पर्सनल डिपार्टमेंट चे अधिकारी आणी यूनियन लिडर ची मनमानी / हुकुमशाही सुरु आहे. कित्येक वर्षापासुन बल्लारपुर चे स्थानीक ठेकेदारी कामगार मागील १४, १५ वर्षापासुन आपले रक्त जाळुन कुंटुबांचे उदरनिर्वाह करीत आहेत. मनात अनेकदा विचार येतात की Seniority नुसार कधीतरी कंपनी चे निर्दय अधिकारी ठेकेदारी कामगारांवर दया करतील आणी एवढ्या वर्षापासुन काम करीत असल्यामुळे आज ना उद्या त्यांना सुद्धा नियमित करण्यात येणार. ठेकेदारी कामगारांच्या परिवारातही आनंदाचा क्षण येईल या आशेने कामगार काही न बोलता वाट बघतात परंतु दर वर्षी युनियन लिडर ठेकेदारी कामगारांचे नसीब लिहीतात.
जो कामगार नियमीत कामावर येतच नाही. फक्त रिलीवर चे काम करत होता अशा लोकांना पेपरमिल चे अधिकारी यूनियन शिफारशीप्रमाणे परमनंट करतात कारण तो राजकीय पक्षाचा माणुस असल्यामुळे, मग जे ठेकेदारी कामगार राजकीय पक्षासोबत कोणताही संबंध ठेवत नाही किंवा ज्याच्यांकडे पैसा नाही अशा कामगारांचा वाली कोण?? त्यांना नियमीत होण्याचा अधिकार नाही काय?? ठेकेदारी कामगारांच्या परिवारातील लोकांना फक्त उपासमारी सहन करावे लागेल काय?? असा प्रश्न आंतरराष्ट्रीय मानव अधिकार कम्यूनिटी इंडिया च्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष प्रियाताई झांबरे यांना पडला?? खरोखरच कामगारांच्या हितासाठी, हक्कासाठी निस्वार्थ आवाज उठविला आहे आणी हा आवाज फक्त जिल्हयापर्यंतच नाही तर केंद्रापर्यंत नेण्याची जिद्द निर्माण झालेली आहे. पेपरमिल मध्ये काम करणारे ठेकेदारी कामगार जर आपल्या हक्कासाठी बोलले की अधिकारी कामगारांना चुक नसतांना कामावरुन बंद करतात. त्यांना टारगेट केले जाते ही समस्या आजचीच नाही तर ही मनमानी अनेक वर्षापासुन सुरु आहे म्हणुन बिचारे कामगार अन्याय सहन करतात.
पेपरमिल च्या वरिष्ठ अधिकारी यांचेकडे प्रिया झांबरे यांनी सहा महिन्यापुर्वी लेखी स्वरुपात पत्र देऊन कळविले. तरी अद्याप पेपरमिल कडुन कोणतेही कामगारांच्या हिताचे उत्तर आले नाही. तरी प्रिया झांबरे यांनी प्रण घेतल्याचे दिसुन येत आहे. की जो पर्यंत १५ वर्षापासुन नियमीत काम करणाऱ्या कामगारांचे प्रश्न मार्गी लागणार नाही तो पर्यंत ही लढाई सुरुच राहील,असेही प्रिया झांबरे यांनी म्हटले आहे , माहे जून २०२१, २०२२ मध्ये ज्या ज्या ठेकेदारी कामगारांवर अधिकाऱ्यांकडुन व युनियन लिडर कडुन अन्याय झाला, हुकुमशाही चालवीत बसले होते त्या अधिकारी व युनियन लिडर ची हुकुमशाही सर्वांच्या समोर आणुन देण्याचे ठरविले आहे. अधिकारी फक्त जो पैसा देईल अशाच लोकांना परमनंट करतात, ही मनमानी, तानाशाही कधि पर्यंत चालविणार.
पेपरमिल चे मुख्य व्यवस्थापक कुकडे यांनी तक्रार नोंदविली असल्याचे सांगीतले परंतु अद्याप कुठलेही उत्तर पाठविले नाही असे प्रियाताई झांबरे यांनी सांगीतले. जिल्हाधिकारी चंद्रपुर यांनी सुद्धा चौकशी करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. जर इथे ठेकेदारी कामगारांची पिळवणुक करतील किंवा त्यांना टारगेट करतील तर ही तक्रार वरच्या स्तरावर पोहचायला वेळ लागणार नाही. असा इशारा झांबरे यांनी पत्रकारांशी बोलतानां दिला.