चामोर्शी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
चामोर्शी,दि.२२/०१/२०२३
दैनिक सकाळ तर्फे दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या सकाळ चित्रकला स्पर्धा चामोर्सी येथे यावर्षी जा. कृ. बोमनवार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर घेण्यात आली या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पालकांनी सकाळ चित्रकला स्पर्धेचे कौतुक केले या परीक्षेला केंद्रप्रमुख म्हणून प्रभारी प्राचार्य आय. जी. चांदेकर तसेच परीक्षा पर्यवेक्षक म्हणून प्रा. खुशाल कापगते. नोमेश्वर उरकुडे. नंदकिशोर मेनेवार, सहाय्यक शिक्षक संतोष चावरे, घनश्याम मंनबत्तुलवार,भोंगाळे मॅडम, मीनाक्षी डायकी, भारती पोगुलवार, पत्रे सर तसेच दैनिक सकाळचे बातमीदार अमित साखरे, वृत्तपत्र विक्रेता ज्ञानेश्वर गोहने शिपाई रफिक शेख सुभाष मडावी, दामोदर येंगतीवार यांनी सहकार्य केले सकाळ चित्रकला स्पर्धा उत्साहात पार पडली सकाळ चित्रकला स्पर्धेला पालक तशे विद्यार्थ्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या परीक्षेला सर्व गटातून ८०० विद्यार्थी भाग घेतले.