महाराष्ट्र ‘वाघांची राजधानी’ बनण्याच्या उंबरठ्यावर!

श्री.अरुण बारसागडे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

देशात २०१८ मध्ये व्याघ्र गणना करण्यात आली होती.देशात २९६७ वाघ व राज्यात २५० वाघ असल्याची नोंद करण्यात आली होती. वाघांच्या संख्येनुसार राज्य दुसर्‍या क्रमांकावर होते.ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासह चंद्रपूर जिल्ह्यात २०० पेक्षा जास्त वाघाची संख्या असंल्याचे सांगण्यात येत आहे.२०१८ च्या व्याघ्रगणनेत राज्यात २५० बछडेही आढळून आले होते. त्यामुळे यंदाची व्याघ्र गणना जाहीर झाल्यास राज्य ‘वाघाची राजधानी’ बनण्याच्या उंबरठ्यावर असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसे झाल्यास राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तराखंड, आसाम, झारखंड, राजस्थान, ओडिशा, पश्‍चिम बंगाल, केरळ, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, बिहार, मिझोराम, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि उत्तरांचल अशा १९ राज्यांमध्ये वाघांचे अस्तित्व आढळून आले आहे. दर चार वर्षांनी वाघांची गणना होते. गणना करताना केवळ पूर्ण वाढ झालेल्या वाघांचीच गणना करण्यात येते, बछडे त्यात मोजले जात नाहीत. २०१८ मध्ये करण्यात आलेल्या व्याघ्रगणनेत देशात एकूण २९६७ वाघ आढळून आले होते. याच व्याघ्रगणनेत राज्यात एकूण २५० वाघ आढळले होते. त्याचप्रमाणे ही गणना करताना २५० बछडेसुद्धा आढळून आले होते. मागील चार वर्षांचा विचार करता मागील व्याघ्रगणनेत बछड्यांची आता पूर्ण वाढ झालेली असणार आहे. त्यामुळे या बछड्यांची गणनासुद्धा प्रौढ वाघांमध्ये होणार आहे.

वेगवेगळ्या कारणांनी बछड्यांचे जगण्याचे प्रमाण ३० ते ४० टक्के एवढेच असते. या टक्केवारीने २५० बछड्यांपैकी किमान ७५ ते १०० बछडे मागील चार वर्षांत जगले असतील, असे गृहीत धरले; तर राज्यातील वाघांची संख्या ३२५ ते ३५० च्या घरात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सुदैवाने आणखी पाच-पन्‍नास बछडे जास्तीचे जगले असतील, तर राज्य व्याघ्रसंख्येच्या बाबतीत अव्वल ठरण्याची शक्यता आहे. मागील व्याघ्रगणनेवेळी देशात वाघांच्या संख्येच्या बाबतीत ३५३ वाघांसह कर्नाटक प्रथम क्रमांकावर आहे, तर २५० वाघांसह महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश संयुक्‍तरीत्या दुसर्‍या स्थानावर होते. गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या कारणांनी मध्य प्रदेश आणि कर्नाटकातील वाघांचे महाराष्ट्रासह शेजारच्या अन्य राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. राज्यातील राधानगरीच्या जंगलातही गेल्या काही वर्षांत कर्नाटकातून आणि ताडोबा, पेंच, नागझिरा अभयारण्यात मध्य प्रदेशातून येणार्‍या वाघांचे प्रमाण वाढले आहे. या सगळ्या बाबी विचारात घेता, यंदाच्या व्याघ्रगणनेत राज्य अव्वल ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तसे झाले तर आज केवळ विदर्भाला असलेला ‘व्याघ्र राजधानी’चा दर्जा संपूर्ण राज्याला लागू होण्याची आशा बाळगायला हरकत नाही.

यंदा देशांतर्गत व्याघ्रगणना झालेली आहे; मात्र त्यामध्ये योग्य मूल्यांकन आणि अचूकतेचा अभाव आढळून आला. त्यामुळे यंदा व्याघ्र दिनादिवशी देशांतर्गत वाघांची संख्या जाहीर न करता काहीशा विलंबाने ती निश्‍चित केली जाणार असल्याचे वन विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, ज्यावेळी व्याघ्रगणनेचे अचूक आकडे जाहीर होतील, त्यावेळी कदाचित महाराष्ट्रच अव्वल ठरण्याची आशा काही वनाधिकार्‍यांनीही व्यक्‍त केली आहे.यदा कदाचित वाघाची संख्या इतर राज्याच्या तुलनेत वाढली तर महाराष्ट्र राज्य देशात वाघांची राजधानी म्हणून ओळख निर्माण होणार

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वाघांची संख्या वाढत असून दिवसेंदिवस त्यांच्या मानवीय हल्लयात सुद्धा वाढ होतांना दिसून येत आहे , वनविभागाने यासाठी काय उपाय योजना केलेली आहे ? याची सुद्धा माहिती वनाधिकाऱ्यांनी द्यायला पाहिजे , गडचिरोली जिल्यात सातत्याने वाघ आणि बिबट चे मानव आणि पाळीव जनावरांवर हल्ले होत असून कित्येक लोकांनी भीतीपोटी शेतीसुद्धा केलेली नाही तेव्हा प्रशासनाने या गोष्टीकडे सुद्धा गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे — राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस विधानसभा अध्यक्ष श्री.रुपेश वलके गडचिरोली