सावरगावत धार्मिक वातावरण,87. वर्षाची परंपरा “एक गाव एक गणपती 

श्री. अरुण बारसागडे, जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर 

नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील सार्वजनिक हनुमान आणि गणपती समाज मंडळाने येथे अनेक वर्षांपासून सुरू असलेली ‘एक गाव गणपती’ ची परंपरा आजतागायत कायम असून आजघडीला या परंपरेला ८७ वर्षे पूर्ण होत आहेत . स्वातंत्र्यपूर्व काळापासून सावरगावात ‘ एक गाव एक गणपती’ची परंपरा शतकाकडे वाटचाल करत आहे.

. शतकाकडे वाटचाल करणाऱ्या व सामाजिक सलोखा जपणाऱ्या गावात मानाचा तुरा रोवणाऱ्या उपक्रमशील महोत्सवाला आज ८७ वर्षे पूर्ण होत आले आहेत. प्रत्येक वर्षी यानिमित्याने महाप्रसादाचे आयोजन असते परंतु दोन वर्षाच्या कोरोना काळात फक्त गणपतीची स्थापना करून महाप्रसादाची परंपरा खंडित झाली होती . परंतु दोन वर्षाच्या विश्रांती नंतर महाप्रसाद असल्याने गवकऱ्यात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे.

नागभिड तालुक्यातील सावरगाव येथे 87 . वर्षापूर्वी गावातील सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या व गावाबद्दल आपुलकी असणाऱ्या नागरिकांनी गावात “सार्वजनिक हनुमान व गणपती समाज मंडळ” ची स्थापना केली . तेव्हापासून संपूर्ण गावाचा ‘एक गाव एक गणपती’ ही प्रथा सुरू करून या निमित्याने गावात उत्सवच सुरू झाला .

शतकाकडे वाटचाल करणाऱ्या मंडळाचे आजपर्यंत तीनच अध्यक्ष झाले हे विशेष ! पहिले अध्यक्ष लक्ष्मण पाटील बोरकर , दुसरे रामकृष्ण महाजन साहारे , तर तीसरे मोरेश्वर ठीकरे हल्ली कार्यरत आहेत .
गावात एकोपा निर्माण व्हावा सर्वत्र शांतता , सलोखा नांदावी एकमेकांच्या विचारांची देवाण – घेवाण व्हावी . या संकल्पनेतूनच गणेशोत्सवाला सुरुवात झाली आणि आज गावातील ‘ एक गाव एक गणपती ‘ ही परंपरा इतर गावाना आदर्श ठरत आहे.
आज हल्ली सहा हजाराहून अधिक गावाची लोकसंख्या आहे . येथे अनेक जाती धर्माचे लोक राहतात,

दोन वर्षांनंतर आजच्या झालेल्या आमसभेत शासनाकडून प्लास्टिक बंदी असल्याने प्रशानाने ठरविलेले नियमाचे काटेकोर पालन करीत असल्याने यावर्षी जेवणावळीत प्लास्टिक पत्रावळी ऐवजी पानाच्या पत्रावळी तयार करण्याच्या सूचना सभेत दिल्या आहेत. त्यामुळे या वर्षात दुर्मिळ झालेल्या पानाच्या पत्रावळीत जेवण मिळणार आहे.त्यामुळे 2दिवस पडल्या जातात. हयादिवसात कुणीही कोणत्याही कामावर जातं नाही हे विशेष आहे.

21.लोकांची कार्यकारिनी असून समाज मंडळाचे अध्यक्ष मोरेश्वर ठिकरे , उपाध्यक्ष सुधाकर सहारे , सचिव प्रभाकर बोरकर , तर सदस्यगण गणपत ठिकरे वनवास दुधकुरे , लक्ष्मण बोरकर , सोमेश्वर ठिकरे, देविदास बोरकर , सरपंच रवींद्र निकुरे , मन्साराम बोरकर , श्रीराम बोरकर गणपत श्रिकोंडवार , अमर मांढरे , खुशाल गेडाम दादाजी मुंगमोडे ,कृष्णाजी सहारे , देवदास बोरकर, उद्धव मुंगमोडे आदी धुरा सांभाळत आहेत .