श्री.अनिल गुरनुले विशेष प्रतिनिधी, न्यूज जागर
एटापल्ली तालुक्यातील सुरजागड प्रकल्पातून लोहखनिज उत्खनन करुन येथील चुरा दगड उचल करण्यासाठी त्रीवेणी अर्थ मुव्हर्स कंपनीद्वारे विविध जिल्ह्यातील व राज्यामधील अनेक ट्रान्सपोर्टचे ८००ते१००० पेक्षा जास्त वाहत सुरजागड लोहखनिज प्रकल्पात आहे याच वाहनांने एटापल्ली ते चंद्रपूर या ३५३ राष्ट्रीय महामार्गावरून लोहयुक्त दगड नेने सुरु आहे मात्र वाहतूकीमुळे या महामार्गावर मोठ मोठे खड्डयांचे जाळे निर्माण झाल्याने या महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व शाळेकरी विद्यार्थ्यांना जिव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो
विशेष म्हणजे या राष्ट्रीय मार्गावर मोठ मोठे खड्डे निर्माण झाल्याने अहेरी बस आगाराकडून बस सेवा सुद्धा बंद करण्यात आली होती यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अळथळा निर्माण झाले सदर विद्यार्थ्यांना बस स्थानक जवळ येऊन बस कधी येईल याची प्रतीक्षा करावी लागत होती मात्र बस न आल्याने आल्या पावली घरी परत जावे लागत होते कधी कधी तर याच विद्यार्थ्यांना शाळेची सुट्टी झाल्या नंतर सुद्धा घरी येण्यास रात्रो होत होती हे सर्व अडचणी बघून बोरी व राजपूर पँच ग्रामपंचायत हद्दीतील समस्त संतप्त झालेले ग्रामपंचायत चे पदाधिकारी, नागरिक, पालक तसेच युवक वर्गांनी या विद्यार्थ्यांसाठी भर पावसात रस्त्यावर उतरून सुरजागड प्रकल्पाचा निषेध करत सुरजागड मधील वाहण सुद्धा तिन ते चार तास बोरीच्या मुख्य चौकात थांबविले तसेच सुरजागड वाहणामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना होत असलेल्या त्रासामुळे संतप्त गावातील नागरीकांनी सुजागड प्रकाल्पाच्या विरोधात नारेबाजी सुद्धा केली विशेष म्हणजे येथील नागरिकांना रस्ते सुरळीत करणे व बस सेवा सुरळीतपणे चालू ठेवणे व या मार्गावर सुरजागड प्रकल्पातील वाहनांमुळे धूळ पसरून नागरिकांना जो त्रास सहन करावा लागतो त्या पर्याव व्यवस्था करणे या मुख्य मागण्यांसाठी येथील नागरिक भर पावसात रस्त्यावर ठीया आंदोलन केले आहे
अहेरी पोलीस स्टेशन चे प्रभारी पोलिस निरीक्षक श्री पंकज बोनसे यांना कळताच त्यांनी आपल्या चमुसह अहेरी आगाराचे आगार प्रमुख युवराज राठोड यांना सुद्धा घेऊन बोरी येथे दाखल झाले , प्रभारी पोलिस निरीक्षक बोनसे यांनी नागरिकांची समजवनूक केली मात्र संतप्त बोरी परिसरातील नागरिक ऐकायला तयारच नव्हते काही वेळाने सदर नागरीकांना प्रभारी पोलिस निरीक्षक बोनसे व अहेरी आगारातील आगार प्रमुख युवराज राठोड यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात येइल या बद्दल आश्वासन दिले
त्या नंतर आलापल्ली ते आष्टी या राष्ट्रीय मार्गावरील चार ते पाच किमी.पर्यंत लागलेल्या वाहतूकीची रांग सुरळीत पणे चालू करण्यात आली यावेळी बोरी ग्रामपंचायत चे सरपंच श्री शंकर कोडापे, उपसरपंच श्री पराग ओल्लालवार, सदस्य महेश सेडमाके राजपूर पँच ग्रामपंचायत चे सदस्य मधूकर वेलादी,सुरेश गंगाधरीवार, शंकर सिडाम, सामाजिक कार्यकर्ते नितीन गुंडावार,अशोक वासेकर,विजय कोकीरवार, राजेश नम्बीयार,रामलू कुळमेथे, पांडूरंग रामटेके,पोचू मंचालवार,अंकीत दुर्गे, पांडूरंग बोमकंटीवार,राजन्ना संगर्तीवार,यांच्यासह बोरी व राजपूर पँच परिसरातील नागरीक उपस्थित होते
सुरजागड प्रकल्पातील जे वाहन क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात लोहखनिज वाहतूक करीत आहे अशा १६ वाहनांवर मी स्वता कारवाई केली आहे व नागरीकांना तसेच शाळेकरी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बस ची अडचणी निर्माण होत आहे ती अडचणी दूर करण्यासाठी मी स्वता अहेरी आगारचे आगार प्रमुख युवराज राठोड यांना सोबत घेऊन आलेलो आहे व बस सेवा सुद्धा मीळणार तसेच सुरजागडच्या वाहनांमुळे जी अडचणी निर्माण होत आहे याबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल ठाकूर साहेब यांच्याशी चर्चा करून आपले शिष्टमंडळ व सुरजागड प्रकल्पातील प्रतिनिधी यांची सभा घेऊन आपणास होणारी अडचणी दूर करु–प्रभारी पोलिस निरीक्षक श्री.पंकज बोनसे
आपणास अशी हमी देतो की अहेरी आगारातील बसेस अहेरी ते चंद्रपूर मार्गे लगाम या मार्गाने उद्यापासून बस सेवा सुरळीतपणे चालू होणार–श्री.युवराज राठोड आगार प्रमुख अहेरी