श्री.नंदकिशोर वैरागडे,प्रतिनिधी , कोरची, न्यूज जागर
छत्तीसगड राज्यच्या स्तृत्य उपक्रमाला आमदार तथा संसदीय सचिव इंदलसाय मडावी त्यांची उपस्थिती
कोरची
झाडाला फळे लागतात पण झाड कधी फळ खात नाही ती फळ इतरांच्या उपयोगी पडत असतात असेच काही कोरची तालुक्यातील गोडरी गावातून उगम झालेल्या शिवनाथ नदीमुळे छत्तीसगड राज्याची जीवनदायी ठरलेली नदी कोरची तालुक्यातील लोकांना उपयोगाचे नसले तरी आम्हाला ती जीवनदायी आहे असे उद्गार आमदार तथा संसदीय सचिव इंदल साहेब मडावी यांनी महाआरती कार्यक्रम बोलत होते.
धान का कटोरा म्हणून प्रख्यात असलेल्या छत्तीसगड राज्याला सिंचनापासून पिण्याच्या पाण्याची सोय करून देणारी छत्तीसगड राज्याची जीवनदायी असलेला शिवनाथ नदीचा उगम स्थान असलेल्या कोरची तालुक्यातील गोडरी येथे छत्तीसगड प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून आमदार तथा संसदीय सचिव इंदलसाय मडावी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली .
छत्तीसगड राज्यातील चौकी राजनांदगाव रायपूर भिलाई पासून सर्व गावांना सिंचनाच्या सोयीपासून पिण्याच्या पाण्याची सोय करणारी शिवनाथ नदी मुळे छत्तीसगड राज्यातील जनतेला जीवनदायी असलेल्या नदी मुळे आपला जीवन सर्व गोष्टींना परिपक्व आहे अशी धारणा ठेवून छत्तीसगड शासनाने उगमस्थान असलेल्या गोडरी गावात येऊन प्रशासकीय महाआरतीचे 24 सप्टेंबरला आयोजन करण्यात आले होते या महाआरतीचे शासकीय प्रतिनिधी म्हणून आमदार तथा संसदीय सचिव इंदल से मडावी यांना जबाबदारी देऊन प्रशासनाने जबाबदारी दिली होती यावेळी छत्तीसगड राज्यातील बहुसंख्य नागरिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष गडचिरोली जिल्हा परिषद माजी कृषी सभापती नाना नाकाडे होते गडचिरोलीची माजी आमदार नामदेवराव उसेंडी,हे प्रामुख्याने उपस्थित होते.