जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आंदोलन

श्री.नंदकिशोर वैरागडे, प्रतिनिधी , न्यूज जागर 

कोरची :-
राज्य सरकारी -निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर चतुर्थ श्रेणी कर्मचारी समन्वय समितीतर्फे आयोजित जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यव्यापी बाईक रॅली राज्यभर आयोजित केली आहे. त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुका मुख्यालयात सुद्धा विशाल बाईक रॅली काढून सरकारचे लक्ष आपल्या मागणीकडे केले. यानंतर कोरची तहसील कार्यालय नायब तहसीलदार चंद्रशेखर गजभिये यांना निवेदन देण्यात आले.

या बाईक रॅलीत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना तालुका शाखा चे सचिव नरेश रामटेके, प्रसिद्धी प्रमुख सुरज हेमके, महेश चौधरी, व इतर पेन्शन फाइटर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोबतच महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ तालुका शाखा कोरचीचे अध्यक्ष ए डी भोयर ,व सचिव राहुल कोपुलवार बहुसंख्येने महासंघाचे कर्मचारी उपस्थित होते. तसेच राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना कोरचीचे पदअधिकारी पटले व भैसारे उपस्थित होते.