न्यायालयात पोहोचलेले खेडी-गोंडपिपरी मार्गाचे काम अपुर्णचं

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर 

रस्ता रूंदीकरणासह मजबुतीकरणाचे काम न्यायालयात पोहोचुनही खेडी गोंडपिपरी मार्गाचे काम पुर्णत्वात येत नसल्याने कासवगतीने सुरू असलेल्या सदर मार्गाच्या कामासोबतच संबंधीत कंञाटदाविषयी आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
चंद्रपूर-गडचिरोली महामार्गाला जोडून असलेल्या खेडी गोंडपिपरी पुढे अहेरी हा राज्य मार्ग जातो. सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २ च्या कार्यक्षेत्रात असलेल्या खेडी-गोंडपिपरी-धाबा-पोडसा या राज्य मार्गावरील ७५ कि.मी. लांब मार्गाची गरज नसतांना हायब्रीड अँन्युईटी योजने अंतर्गत रूंदीकरण व मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यांत आले. २१८.२१ कोटी रूपये खर्चाचे हे काम हैद्राबाद येथील एसआरके या कंपनीने घेतले असले तरी प्रत्यक्षात मात्र नागपूर येथील पोडसा रोडवेज प्रा.लि. ही कंपनी सदर मार्गाचे काम करीत असल्याचे दिसून येते.

कामाच्या आदेशातील अटी आणि शर्थीप्रमाणे सदर कंत्राटदारास २०२० पर्यंत सदर मार्गाचे काम पुर्ण करावयाचे होते. परंतु सदर कंत्राटदाराने नोव्हेंबर २०१९ पासून सदर मार्गाच्या कामाला सुरूवात केली. त्यामूळे २०२० पर्यंत सदर मार्गाचे पुर्ण होवू शकले नाही. काम पुर्ण करण्यास तांञीक अडचणी आल्याने मुदत वाढवुन देण्याची विनंती केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने मुदतही वाढवुन दिली. तरीसुध्दा सदर मार्गाचे काम आजही पुर्ण झालेले नाही. कोट्यावधी रूपयांच्या या कामावर काल परवा पर्यंत एकच जेसीबी खोदकाम करतांना दिसुन आला. सदर मार्गाच्या कामाचा कंञाट घेतांना मार्गावर असलेले लहान मोठे असे एकुण ११६ पुलाचे काम हाती घेण्यांत आले, त्यापैकी बहुतांश पुलाचे काम आजपर्यंत पुर्ण केले नाही. त्यासाठी १० ते १५ फुट खोल खड्डे खोदून ठेवले. परंतू खोदुन ठेवलेल्या या खड्डयाचे आजुबाजुला कोणत्याही प्रकारच्या संरक्षणाची व्यवस्था केली नाही शिवाय थातुर माथुर काम करून प्रवासाच्या दृष्टीने सदर मार्गाची दैनावस्था केली आहे. त्यामूळे सदर मार्ग आजही वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरत असुन आजपर्यंत अनेक जीवघेणे अपघात घडले आहेत. त्यामूळे सदर मार्गाचे काम तातडीने पुर्ण करावे. अशी परीसरातील नागरीकांची मागणी आहे.

परंतू संबंधीत कंत्राटदार ग्रामस्थांच्या या मागणीकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असून सार्वजनिक बांधकाम विभागही या कामाकडे गांभीर्याने पाहतांना दिसत नाही. त्यामूळे नांदगांव येथील सरपंच हिमानी वाकुडकर यांनी सदर मार्गाच्या कामाविरूध्द न्यायालयात दाद मागीतली आहे. असे असतांना काम पुर्ण करून देण्याची जबाबदारी स्विकारलेला संबंधीत कंत्राटदार सदर काम पुर्ण करण्यासाठी फारसा गंभीर असल्याचे दिसत नाही. त्यामूळे सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधीत कंत्राटदाराचा सदर कामाचा कंत्राट रद्द करून अन्य नामांकित कंत्राटदार कंपनीस सदर मार्गाचा कंञाट द्यावा, या मागणीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. त्यामूळे प्रशासन आणि न्यायालयाची भिती न बाळगता सदर मार्गाच्या कामाकडे दुर्लक्ष करणारा कंञाटदार कोण ? या विषयी चांगलीच चर्चा आहे.