ब्रह्मपुरीत एकाच परिवारातील चौघांनी केला वीष प्राशन करून सामूहिक आत्महत्या

श्री.अरुण बारसागडे, जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर 

आईचा मृत्यू तर वडील आणि दोन मूले गंभीर

ब्रह्मपुरी: तहसील कार्यालयात नोकरीवर असलेल्या एका रिटायरमेंट रमाकांत ठाकरे यांच्या परिवारातील मुलांसह कुटुंबातील सर्वच व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला त्यामध्ये ब्रह्मपुरीतील देललवाडी अपार्टमेंटमध्ये कार्यरत ठाकरे परिवारातील रमाकांत ठाकरे यांच्या पत्नीचा मृत्यू झाला असून दोन मुले गंभीर व वडील रमाकांत ठाकरे हे गंभीर आहेत.

प्राप्त माहितीनुसार वडील रमाकांत ठाकरे हे ब्रह्मपुरी च्या तहसील कार्यालयात नोकरीवर होते परंतु मुलांना नोकरी लागत नसल्यामुळे घरी परिवारात नेहमी फटके उडायचे शिवाय चांगले  वातावरण नव्हते , मुले लग्नाचे झाल्यानंतर परिस्थिती बेताची नव्हती , नेहमीच पैशाची अडसर भासायची शिवाय मुलांचे लग्न कसे करायचे आणि नोकरी लावायची कुठून असा प्रश्न नेहमीचा होता तेव्हा हताश होऊन  यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती प्रसार माध्यमांसमोर येत आहे ,  रात्री बारा वाजता सामूहिक परिवारांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे त्यापैकी गीता ठाकरे यांचा जास्त विष  प्राशन सेवनाने मृत्यू झाला असून त्यांच्यावर ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन सुरू आहे suicide in bramhapuri तर
रमाकांत दामोदर ठाकरे वडील वय 53 राहुल रमाकांत ठाकरे 27 मनोज रमाकांत ठाकरे वय 26 यांची तब्येत अधिक बिघडलेली  असून त्यांना गडचिरोली येथील सामान्य जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे