शहरवासियांच्या समस्या सोडविण्यासाठी वंचितने केले नगर परिषदेला ताला ठोको आंदोलन

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
पोलिसांचा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न
ताला ठोकण्याआधी मुख्याधिकारी आले गेटमध्ये आंदोलकांशी चर्चा करायला
गडचिरोली,
वंचित बहुजन आघाडी शहर शाखा गडचिरोलीच्या वतिने शहरातील समस्या सोडविण्यासाठी वांरवार निवेदन देऊनही मुजोर नगर परिषद प्रशासन ऐकत नसल्याने आज ताला ठोको आंदोलन करण्यात आले.
नगर परिषदेला ताला ठोकणयासाठी आंदोलक मुख्याधिका-यांच्या प्रवेशद्वारावर पोहचताच पोलिसांनी आंदोलकांना अडविले परंतु आंदोलक ऐकण्याच्या परिस्थितीत नसल्याने स्वत: मुख्याधिकारी दारात येऊन आंदोलकंशी चर्चा केली यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करणारे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे, महासचिव योगेंद्र बांगरे , बाशिद शेख , मालाताई भजगवळी, उपाध्यक्ष जी के बारसिंगे यांच्या कडून मुख्याधिका-यांनी समस्या ऐकून घेतल्या व शहरातल्या सर्व समस्या सोडविण्यासाठी समिती गठीत करून सर्वे करण्यात येईल व येणा-या पंधरा दिवसात सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येईल असे आश्वासन देिल्यामूळे आंदोलक शांत झाले.