By Arun Barsagade
वेकोलीने सहा महिन्यांच्या रकमेचे धनादेश नगरपरिषदेकडे केले जमा
घुग्घुस :
येथील अमराई वॉर्डात भुस्खलनात स्थलांतरित अशिक्षित गरीब नागरिकांना एकत्रीत करून त्यांना भडकविण्याचा प्रयत्न करून काँग्रेस नेत्यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा कटकारस्थान रचल्या गेला आहे.नागरिकांना घर भाड्याचे पैंशे मिळणार नसल्याच्या बातम्या ह्या खोटया आहे.18 ऑक्टोबर रोजीच वेकोलीने एकशे साठ लोकांचे सहा महिन्याचे अठ्ठावीस लाख अंशी हजार रुपयांचा धनादेश नगरपरिषदेच्या स्वाधीन केला आहे.नगरपरिषदेने सदर धनादेश बँकेत जमा केला मात्र रक्कम मोठी असल्याने सदर घरभाड्याच्या पैश्याला चार पाच दिवस लागणार आहे.
असे असतांना केवळ खासदार बाळू धानोरकर व काँग्रेस नेते राजुरेड्डी,रोशन पचारे,पवन आगदारी यांना बदनाम करण्यासाठीच अशिक्षित व भोळ्या लोकांच्या अज्ञानतेचा फायदा घेतला जात असून त्यांची दिशाभूल केली जात आहे.
अमराई येथे 06 ऑगस्ट रोजी एक घर जमिनीत शंभर फूट गाडल्या गेले घटनेची गंभीरता लक्षात घेऊन काँग्रेस नेत्यांनी खासदार बाळू धानोरकर यांना घटनास्थळी बोलाविले खासदार साहेबानी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी, वेकोली अधिकारी व प्राशसकीय अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली यामध्ये नागरिकांना शासनाच्या माध्यमातून घरपट्टे व घर मिळवून देण्यात यावे तोपर्यंत एकशे साठ नागरिकांना प्रति महिना तीन हजार रुपये देण्यात यावे असे ठरले व पहिल्या महिन्याचे तीन हजार रुपये नागरिकांना वाटप ही करण्यात आले.
मात्र यानंतर नवरात्रोत्सव विजयादशमी व उत्सव आल्याने वेकोली तर्फे घरभाड्याची रक्कम मिळण्यास उशीर झाल्याने खासदारांनी वेकोली अधिकारी यांना उरलेल्या सहा महिन्यांची रक्कम एकाचवेळी द्यावी ही मागणी केली व ती वेकोली अधिकाऱ्यांनी मान्य ही केली
सहा महिन्यांची एकशे साठ नागरिकांचे अठ्ठावीस लाख अंशी हजार रुपयांचे धानादेश 18 ऑक्टोबर रोजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गादेवार यांच्या स्वाधिन करण्यात आले.
सदर रक्कम मोठी असल्याने रक्कम मिळण्या करीता तीन ते चार दिवस लागतील असे बँके तर्फे सूचित करण्यात आले सध्या दिवाळी असल्याने दोन ते तींन दिवस उशीर होऊ शकतो असे असतांना स्थलांतरित नागरिकांना वास्तविकता न सांगता व त्यांच्या अज्ञानतेचा फायदा घेत त्यांना एकत्रित भडकविण्याचा प्रयत्न काही स्थानिक व बाहेरील तथाकथित लोकांनी केला असून काँग्रेस नेत्यांचे आश्वासन हवेत विरले असे दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रकाशित केल्या
सदर घरभाडयाचे पैसे आर.टी. जी.एस द्वारे करण्यात येणार असून नागरिकांनी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यां शिवाय अन्य कुणालाही कागदोपत्र देऊ नये अथवा कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये तसेच घर भाड्यासंबंधित शंका असल्यास काँग्रेस नेते राजुरेड्डी,रोशन पचारे,पवन आगदारी यांच्याशी संपर्क करावा असे आवाहान कामगार नेते सैय्यद अनवर यांनी नागरिकांशी केले आहे.