गोठ्यात घुसुन बिबट्याने केले तीन शेळ्या ठार

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर

 

रत्तापूर येथील घटना
रत्नापूर दि 2 5 सिंदेवाही वनपरीक्षेत्र उपवन परीक्षेत्र नवरगाव अंतर्गत येत असलेल्या रत्नापूर बीटातील २त्नापूर येथील रहवासी सखाराम सितकुरा सावसाकडे यांचे घरी गोठ्यात बाधुन असलेल्या दोन शेळी व एक बकरा अशा तीन पाळीव जनावरावर बी बटयाने गोठयात शिरून रात्री ठार केल्याची घटना नुकतीच आज उजेडात आली आहे. बिबट गावात शिरत असल्याने रहवासी जनतेत दहशत निर्मान झाली आहे.

सदर इसमाकडे दोन शेळी व एक बकरा असे तीन पाळीव प्राणी होते दररोज प्रमाणे त्यांनी रात्री आपले राहते घरा शेजारी असलेल्या गोठयात हया तीन्ही शेळ्या बांधल्या व गोठा बंद करून घरी झोपी गेले सकाळी उठल्यानंतर शेळी बाहेर काढण्यासाठी गोठ्यात गेले असता तीन्ही शेळ्या ह्या मृतावस्थेत आढळल्या सदर शेळीचे पोट फोडलेले व मानगुटीवर वार केलेले होते तीनही तेथेच होत्या हे सर्व काम रात्री गावात बिबट या जंगली जनावरानी केले आहे कारण त्याचे पर्गमार्क तेथे होते आपले शेतमजुरी ला जोड म्हणून सदर कुटुंब हा शेळी पालनाचा व्यवसाय करीत होते परंतु आज त्यांचा हा व्यवसाय पूर्णपणे नाहीसा झाला असुन आजचे घडीला अंदाजे त्यांचे जवळपास पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे.

सदर नुकसानग्रस्त यांनी सांगीतले की अगदी दोन महीण्या पूर्वी सुद्धा माझे गोठयातुन एक शेळी अशीच बीबट्याने उचलुन नेवून मारली होती तीचा अजुपर्यंत पत्ता लागला नाही आणी वनविभागाला सांगीतले तर पुरावा नाही म्हणून काहीच कारवाही केली नाही पंरतु आज पूणपणे माझे हे पाळीव धन नाहीसे झाले आहे तरी मला वनविभागाने पन्नास हजार रुपये मदत द्यावी जेनेकरून मला समोर व्यवसाय करण्यास मदत होईल घटनेची माहिती वनविभाग नवरगाव यांना देण्यात आली क्षेत्र सहाय्यक एस बी उसेंडी व वनरक्षक घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला परंतु गावात हया बीबट्याचे आगमनाने गावकरी जनता भयभित झाली आहे सदर नुकसानग्रस्त मालकाला तातडीने मदत देवून बीब ट्या चा बंदोबस्त वनविभागांनी करावा अशी मागणी गावकरी रत्नापूरवासीय जनतेकडुन केली जात आहे