भ्रष्ठ अधिकाऱ्याच्या पाठीशी वरिष्ठ अधीकारी ?- भाग १

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

 

जिवती चे प्रभारी तहसीलदार चिडे यांची करतबगीरी ची प्रिया झांबरे यांनी केली शासनाकडे तक्रार

 

चंद्रपुर आंतरराष्ट्रीय मानव अधिकार कम्यूनिटी भारत तसेच युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने प्रिया झांबरे यांनी जिल्हाधिकारी चंद्रपुर, विभागीय आयुक्त नागपुर एवढेच नाहीतर अपर मुख्य सचिव डाँ नितीन करीर यांचेकडे भ्रष्ट प्रभारी तहसीलदार चिडे यांची पुराव्यासोबत थेट तक्रार केल्याची माहिती झांबरे यांनी दिली. मागील तीन महिन्यापासुन वारंवार तक्रारी करुन सुद्धा अद्याप तहसीलदार चिडे यांचे़वर जिल्हाधिकारी चंद्रपुर यांनी कोणतीही कारवाई केल्याचे दिसुन येत नाही .

२६ जानेवारी ला जिवती चे प्रभारी तहसीलदार चिडे यांनी जिवतीचे रेती माफीया सदाम शेख यांची रेती भरलेली हायवा गाडी क्रं एम एच ३४ ए वी २८९१ ही पकडली आणी जप्तीनामा तयार करुन शेणगांव चे पोलीस पाटील यांचे कडे सुपुर्द केल्याची माहिती पोलीस पाटील शेणगांव यांचेकडुन झांबरे यांना मिळाली, पोलीस पाटील घटनास्थळी पोहचताच सदाम शेख यांनी दुसरी चाबी आणी दुसऱ्या ड्राइवर च्या सहायाने गाडी पडविली, चिडे यांना गाडी पडविल्याची माहिती मिळताच तहसीलदार चिडे नी कर्तव्य बजावत पोलीस स्टेशन जिवती ठाणेदार जगताप कडे लेखी तक्रार केली. परंतु काही दिवसातच सदाम शेख नावाच्या रेती माफीया वर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाल्याचे दिसुन नाही. उलट तहसीलदार चिडे यांनी माहिती अधिकारात सहायक जन माहिती अधिकारी पिपरे यांच्या साहयाने बनावटी व खोटी माहिती देऊन जनतेची तसेच अर्जदार यांची दिशाभुल केल्याची माहिती झांबरे यांनी दिली. २६ जानेवारी २०२२ चा जप्तीनामा व वर्तमान पेपरात बातम्या प्रकाशित होऊन सुद्धा तहसीलदार चिडे व ठाणेदार जगताप यांनी सदाम शेख वर कारवाई केलेली नाही. मेहरबानी मागील कारण काय असा प्रश्न झांबरे यांना वारंवार उपस्थित होत असल्याचे सांगीतले. जिल्हाधिकारी चंद्रपुर यांनी कागदोपत्री पुरावे बघुन सुद्धा चिडे वर कारवाई न होने ही सुद्धा फार मोठी शोकांतीका असल्याचे आंतरराष्ट्रीय मानव अधिकार कम्यूनिटी भारत च्या कार्यकारी अधिकारी झांबरे यांनी माहिती दिली.