नंदप्पा च्या पिडीत गावकऱ्यांच्या मदतीने तलाठी जाधव आणी ग्रामसेवकाचा भोंगळ कारभार प्रिया झांबरे यांनी उघड केली पोलपट्टी

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

 

अतिवृष्टि च्या यादीत एकाच व्यक्तीचे दोनदा समावेश, ज्यांकडे शेतीच नाही अशा लोकांचाही यादीत समावेश

तलाठी जाधव व ग्रामसेवक मिसाळ ची तक्रार जिल्हाधिकारी, तहसीलदार आणी बिडीओ कडे देऊन सुद्धा अद्याप कोणतीही कारवाई किंवा पत्रव्यवहार नाही. कर्मचारी जोमात व अधिकारी कोमात

जिवती तालुक्यातील नंदप्पा गावातील जनतेनी आदर्श मिडीया एसोसिएशन व आंतरराष्ट्रीय मानव अधिकार कम्यूनिटी भारत च्या टीम ला लेखी पत्र देऊन गावातील समस्या जानुन घेण्यास बोलविले,  प्रियाताई झाबंरे यांनी सांगीतले की शासनाने गावकऱ्यांच्या सोईसाठी गावात तलाठी कार्यालय बांधले आणी नंदप्पा साज्याचे काम सांभाळण्याकरिता तलाठी जाधव यांना नियुक्त केले परंतु जाधव मुख्यालयी न राहता कोरपना येथे स्थाई राहतात. नंदप्पा च्या लोकांना काही काम असल्यास त्यांना कोरपना येथे बोलवितात असा कारभार जाधव यांनी चालविला आहे.

नंदप्पा चे ग्रामसेवक सुद्धा मुख्यालयी राहत नाही. मग शासनानी गावात कार्यालय बांधले तरी कशासाठी, तलाठी जाधव व ग्रामसेवकाचा पगार तरी का द्यायचा, जर जनतेला गावात सेवाच मिळत नाही तर ,लोकसेवकांना पगार कशासाठी मिळतो. सरकार जनतेच्या पैशाची उधळपट्टी का करतो??  असा संतप्त सवाल  यांनी केला आहे ,

जिवती तालुका अतिदुर्गम भाग असल्यामुळे कोणतेही अधिकारी कधीच गावात दौरा करीत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांची मनमानी चालते. २०२१ -२२ मध्ये ग्रामसेवक मिसाळ नी एकही ग्रामसभा लावली नाही. फक्त एकाच ठीकाणी बसुन ग्रामसेवकांनी अतिवृष्टि च्या यादीत एकाच व्यक्तीच्या नावाचे दोन यादीत समावेश केला या मागील मास्टरमाइंड कोण ? ग्रामसेवकांना  वरिष्ठांचा आशीर्वाद तर मिळत नाही असे करायला ? असल्याशिवाय एवढी मनमानी करणे शक्य होऊ शकते काय?? अशी शंका हि त्यांनी व्यक्त करून दाखविली .

 

 

गावात १५७ शौचालय मंजुर झाले त्यापैकी अंदाजे ५१ शौचालय खोदकाम न करता फक्त उभे केले .प्रत्येकी शौचालय १२,०००/- मग १५७ शौचालयाची रक्कम एकुन १,८,८४,००००/- रक्कम उचल केली. यांची शहानिशा , शासनानी नेमलेले वरिष्ठ अधिकारी करणार आहेत  कि नाही   ? असा प्रश्न निर्माण झाला आहे

जर वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळ मिळत नसेल तर लवकरच आपण यावर पुराव्यानिशी प्रसार माध्यमांसमोर मांडू असेही प्रियाताई झाबंरे यांनी कळविले आहे