गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर
दि.२३/११/२०२२ नवरगाव
बौद्ध समाज नवरगांव गिलगांव येथील जागेवर गेल्या काही वर्षापासुन पंचशिल झेंडा आहे. सदर झेंडा फडकवितांना गावातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येवून कार्यक्रम घेतात . सदर झेंड्या जवळील चौकाला “डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक” असे नाव द्यावे अशी मागणी बौद्ध समाज बांधव नवरगांव यांनी ग्रामसभेच्या ठरावात मंजुर करून घेतले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचे नामफलक लावले पण त्यामुळे काही जातीयवादी लोकांनी आक्षेप घेत या फलकाला विरोध केला यातूनच वादाची ठिणगी पेटली.
एस.डी .पी.ओ . साहेब तहसिलदार साहेब,पोटेगाव चे ठाणेदार . सार्व. बाधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी गावकर्याना समजविण्याचा प्रयत्न करव्यात आला बौद्ध बांधवांची कम सख्या बघता तात्पुर्ते पोलिस चौकी घ्यावी व शातता निर्माण करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी चे नेते मुनिश्वर बोरकर ‘ भारत मुक्ती मोर्चा चे जर्नाधन तांकसाडे , प्रकाश बांबोळे सहीत बौद्ध बांधव नवरगाव यांनी केली आहे .प्रशासन कोणते निर्णय घेतात याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.