गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
चामोर्शी, दि. १३/१२/२०२२
महाराष्ट्र राज्यात समग्र शिक्षा योजना ही केंद्र सरकार व राज्य सरकार पुरस्कृत महत्वाकांक्षी योजना सन १९९९ पासून करार कर्मचारी यांच्या भरोशावर राबविण्यात येत आहे.विद्यार्थी-शिक्षक शाळा आणि सर्व प्रकारच्या शैक्षणिक योजनांची अंमलबजावणी यशस्वी करण्यासाठी या करार कर्मचाऱ्यांचा उपयोग करून घेतल्या जात आहे.परंतू बिस ते बावीस वर्षे होऊनही या कर्मचाऱ्यांना शासनाने सेवेत अद्यापही कायम केले नाही.तसेच गेल्या पाच वर्षात कोणत्याही प्रकारचे मानधन वाढ केलेले नाही.परंतू या वर्षीच्या हिवाळी अधिवेशनात गडचिरोली जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार डॉ देवराव होळी यांनी या कर्मचाऱ्यांचा मानधन वाढीचा मुद्दा लावून धरला आहे.त्यामुळे चामोर्शी तालुक्यातील गट साधन केंद्र चामोर्शी येथील करार कर्मचारी चांगदेव सोरते,विवेक केमेकर,रवी खेवले,जीवन शेट्टे,रवी मेश्राम,वंदना चलाख,मेघा कोहपरे, कर्मचाऱ्यांनी आमदार डॉ देवराव होळी यांचे अभिनंदन केले आहे.