प्रेसनोट
बल्लारपूर पेपरमिल कामगार समस्यांच्या विरोधात आमरण उपोषण ला कु. प्रिया परमेश्वर झांबरे, महिला आघाडी विधानसभा अध्यक्षा युवा स्वाभिमान पार्टी बल्लारपूर ,या बसणार होत्या. पण मा. जिल्हाधिकारी साहेब सा. चंद्रपूर यांचे कार्यालयीन आदेश के. एमएजी/कार्या- ८/टे-३/साले / २०२२-१२००/- दिनांक २८/११/०२२ अन्वये चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस कायदयाचे कलम ३७ (१) (३) दिनांक १/१२/२०२२ वे ००.०१ ते दिनांक १५/१२/२०२२ चे २४/०० वा. पर्यंत लागू केले आहे. तसेच जिल्हयात होणारी राजकीय, सामाजिक / जातीय कार्यक्रम आंदोलने व निर्दशने इत्यादी आंदोलने कार्यक्रम सण उत्सव दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. व बल्लारपुर तालुक्यात १५ डिसेंबर पर्यंत आचारसहिंता लागु असल्यामुळे उपोषणाला १५ तारखेपर्यंत स्थगीती देण्यात आली आहे.
आमरण उपोषणाची पुढील तारीख २२/१२/२०२२ ठरली असुन, २२ डिसेंबर पुर्वी जर पेपरमिल च्या अधिकाऱ्यांनी कामगारांच्या समस्यावर चर्चा करुन जुन्या ठेकेदारी कामगारांच्या समस्या सोडविल्या नाहीत तर २२ डिसेंबर पासुन आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात येईल. याला जबाबदार पेपरमिल चे अधिकारी असतील. असे प्रिया ताई झांबरे यांनी सांगीतले आहे , पेपरमिल च्या अधिकाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे ठेकेदारी कामगारांपैकी एक कामगार हा कायम चा अपंग झाला आहे. बाकीच्या कामगारांवर अन्याय होऊ नये याकरीता पेपरमिल कंपनी च्या अधिकाऱ्या विरोधात आमरण उपोषण करण्यात येत आहे. असे प्रियाताई झांबरे,महिला आघाडी विधानसभा अध्यक्षा युवा स्वाभिमान पार्टी बल्लारपूर यांनी कळविले आहे.