श्रावण महिन्यात सुरुवातीपासूनच रात्रीच्या सुमारास मंदिर व घराघरातून भजनाचे सूर कानी पडतात भजनाच्या माध्यमातून ईश्वराची आराधना केली जाते त्यामुळे शहरात अनेक भजनी मंडळ या महिन्यापासून विविध सण उत्सवांमध्ये भजन करतात श्री दुर्गा साई भजन मंडळ अनेक वर्षा पासुन परंपरा जोपासत आहे या मंडळाच्या भजनात अबालवृद्ध ईश्वराच्या भक्तीत दंग होतात चामोर्शी शहरातील श्री दुर्गा साई भजन मंडळ व शहरातील अन्य भजनी मंडळ विविध प्रकारची भजने सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध करीत आहेत शहरात श्रावण महिन्यापासून विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम तसेच विधी पार पाडले जात आहेत यामध्ये भगवान शंकराच्या पिंडीची पूजाअर्चा ,होम ,यज्ञ, अभिषेक, बिलवार्चन , पूजा ,आरती तसेच धार्मिक ग्रंथाचे वाचन करण्यात येत आहे या माध्यमातून भाविकांना समाधान व मनशांती ची अनुभूती येतो
गुरुपौर्णिमा ते दिवाळीपर्यंत सणाची रेलचेल असते यादरम्यान दीपपूजन, नागपंचमी, रक्षाबंधन कृष्ण जन्माष्टमी ,पोळा, गौरी ,गणपती, शारदा, दुर्गा ,दसरा दिवाळी आदी सण साजरे केले जातात नागपंचमी ते जन्मअष्टमी पर्यंत शेतातील रोहिणी व अन्य कामे मोठ्या प्रमाणात सुरू असतात दिवसभर रोवणीचे कामे केल्यानंतर भजनी मंडळी रात्र भजन करून ईश्वराचे नामस्मरण करतात त्यामुळे दिवसभर शेतीचे कामे करून आलेला थकवा निघून जातो. दिलीप कोठारे , मदन चावरे , दामोदर भांडेकर , प्रवीण नैताम ,रेखा कोठारे , माधुरी चावरे,गीता ताई खांडेकर . जीवनदास लटारे ,मंडरे आदी भजनी मंडळी भजन करतात. शहरातील अनेक वार्डातून नागरिक भजनाकरिता आपापल्या घरी बोलावतात एकूणच श्रावण महिन्यात भक्तीमय वातावरण असते.त्यामुळे चामोर्शी शहरात भजनाची रेलचेलअसल्याचे दिसून येते .
ग्रामीण भागातही भजनाची रेलचेल
श्रावण महिन्यापासून हिंदू धर्मातील विविध सण उत्सव सुरू होतात या महिन्याच्या सुरुवातीपासून दसरा, दिवाळीपर्यंत शहरासह ग्रामीण भागातही भजनाची रेलचेल असते. त्यामुळे ग्रामीण भागात भक्तीमय वातावरण निर्माण होते अनेक ग्रामीण भजनी मंडळांना शहरात भजनासाठी आमंत्रित केले जाते विशेष म्हणजे गौरी ,गणपती ,शारदा, दुर्गा उत्सवात या भजनी मंडळांना विशेष मागणी असते. यातून भक्तीभाव धार्मिक परंपरा ही जोपासली जाते .