इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

धानोरा,दि.०७/०१/२०२३

धानोरा तालुक्यातील मेंढा (लेखा) येथील एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ७ जानेवारी रोजी सकाळी मेंढा येथ उघडकीस आली. नरेश कुमोटी वय 38 रा. मेंढा (लेखा) असे मृतकाचे नाव आहे मृतक हा आपल्या परिवारासह मेंढा येथे राहत होता. दोन तिन दिवसा पुर्वीपासून तो दारू पिऊन गावातच फिरत होता घटनेच्या – दिवशी तो रात्रौ घरचे लोक झोपल्यावर घराशेजारी असलेल्या आपल्या शेताजवळील चिंचेच्या झाडाला दोराने गळफास घेऊन आत्महत्या केली. नरेश घरी न दिसल्याने कुटुंबीयांनी गावात शोधाशोध केली परंतु तो मिळाला नाही सकाळी शोध घेतला असता तो चिंचेच्या झाडाला गळफास घेतलेला आढळुन आला. मृतकास ग्रामिण रुग्नालय धानोरा येथे शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आले शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही अधिक तपास धानोरा पोलिस करीत आहेत