श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
बल्लारशाह,दि.१३/०२/२०२३
बल्लारपूर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार झाल्याची भयानक घटना उघडकीस आल्याने खडबड उडाली आहे. शहरातील एका युवकाने अल्पवयीन मुलीवर वारंवार बळजबरीने शाररीक संबंध ठेवून तिला गर्भवती केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. निखिल प्रकाश यलकुतवार (19)Nikhil Prakash Yalkutwar असे आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन मुलीच्या आईने बल्लारपुर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर पोलिसांनी त्वरित आरोपीस अटक केली आहे.
पोलिस माहितीनुसार अल्पवयीन मुलीचे आरोपी निखील याच्यासोबत मागील चार वर्षापासून प्रेमसंबंध होते. जुलै 2022 मध्ये अल्पवयीन मुलीला आरोपीने त्याचे राहते घरी घेवून गेला व तिच्यासोबत सुरुवातीस सहमतीने शारिरीक संबंध केले. त्यानंतर वारंवार बळजबरीने अल्पवयीन मुलीशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले.
News Jagar दरम्यान पिडीत मुलीच्या आईला तिच्या लक्षणांवरुन शंका येताच तिने तिला रुग्णालयात घेवून गेली. तिथे डॉक्टरांनी अल्पवयीनला तपासून ती गरोदर असल्याचे सांगितले. यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. दरम्यान पिडितेच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे करीत आहेत.