रापमची बस आदळली झाडावर- विद्यार्थी व प्रवाशी जख्मी*

  • By Mr.Amit Sakhare
    गडचिरोली न्युज जागर
    सिरोंचा  तालुक्यातील आई पेठानजीक भरधाव बस झाडावर आदळली. यात २० प्रवासी बालंबाल बचावले. हा अपघात १ मार्च रोजी घडला.
    असरेल्ली येथून सिरोंचाकडे प्रवासी घेऊन बस (एमएच ०६ एस-८८३७) जात होती. आई पेठा नाल्याजवळ चालकाचा ताबा सुटून बस झाडावर आदळली. यात २० जण जखमी झाले. जखमींमध्ये ८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सर्व जखमींना अंकिसा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
    सदर घटना बसचा स्टेअरिंग जाम झाल्याने ही घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत जखमीना प्राथमिक आरोग्य केद्रात पाठविण्याची व्यवस्था केली.