श्री.प्रदीप वाळके,मुख्यसंपादक,न्यूज जागर
चामोर्शी,दि.०९/०२/२०२३
न्युज जागरच्या बातमीचा परीणाम
दारूबंदी असतानाही चामोर्शी तालुक्यात मोठया प्रमाणावर अवैध दारूविक्री होत असल्याचे वृत्त न्युज जागरने प्रकाशित केले होते, सदर वृत्ताची दखल घेत चामोर्शी पोलीसांनी अवैध दारूविक्रेत्यावर कारवाई करण्याचे धाडसत्र सुरू केले, दरम्यान दोन दिवसात सुमारे 51 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने अवैध दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.newsjagar
गडचिरोली जिल्हयात सरकारने दारूबंदी घोषीत केली आहे, देशी, विदेशी दारू स्वतःजवळ बाळगणे, वाहतुक करण्यावर बंदी घतली आहे मात्र चामोर्शी तालुक्यात मोठया प्रमाणावर अवैध दारूविक्री होत आहे, याला पोलीसांची मुकसंम्मती तर नसावी न अशी शंका व्यक्त केल्या जात असल्याने न्यूज जागर मध्ये 2 मार्च रोजी चामोर्शीत मोबाईलव्दारे घरपोच दारू पुरवठा, गावात सर्रास अवैध दारूविक्री, पोलीसांचे दुर्लक्ष या शिर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले होते. बातमीची दखल घेत चामोर्शी पोलीसांनी अवैध दारूविक्रेत्यांवर पाळत ठेवुन होते. दरम्यान 3 मार्च रोजी चामोर्शी पोलिसांनी तालुक्यात धडक मोहीम राबवून शहरातील वाळवंटी चौक येथील भिमराव उमाजी सहारे व वैशाली भिमराव सहारे यांच्या घरी असलेल्या देशी दारूच्या 27 निपा अंदाजे किंमत 2160 तर विदेशी दारू अंदाजे किंमत 1500 अशी एकूण तीन हजार सहाशे साठ रुपये किमतीची दारू जप्त केली. तर लखमापूर बोरी येथील संतोष दडमल यांच्या घरून देशी दारूच्या 74 निपा अंदाजे किंमत 5920 रुपयांची दारू जप्त केली. 4 मार्च रोजी तालुक्यातील कळमगाव येथील देविदास विश्वनाथ चुधरी यांच्याकडून देशी दारू अंदाजे किंमत १२८० तर चंद्रपूर जिल्हयातील सावली येथील सचिन लक्ष्मण मुळेवार यांच्याकडून वाघोली नदी घाटावरून प्लास्टिकच्या चुंगडीमध्ये 90 एम एल च्या पाचशे नीपा अंदाजे चाळीस हजार रुपये किमतीचा माल जप्त करून दारूबंदी कायद्यान्वये चारही आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चामोर्शी पोलिसांच्या या धाडसत्रामुळे मात्र किरकोळ दारू विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
सदर धाडसत्रामुळे सामन्य नागरीकांनी पोलीसांच्या या कारवाईचे स्वागत केले आहे.