चामोर्शी प्रतिनिधी,न्यूज जागर
चामोर्शी,दि.१६/०३/२०२३
चामोर्शी मारोडा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मौजा कर्कापली येथे पेसा अंतर्गत तेंदूपत्ता बोनस वाटपात फसवणूक झाल्याची तक्रार गावकऱ्यांनी पोलीस स्टेशन चामोर्शी येथे दि.१३/०३/२०२३ रोजी नोंदवली आहे.
मौजा कर्कापली या तेंदूपत्ता संकलन केंद्रावर दि. ०५/०५/२०२२ ते १६/५/२०२२ पर्यंत तेंदूपत्ता संकलन केले होते. कर्कापली येते तेंदूपत्ता संकलन केंद्रावर शेकडा ६२५ /- रुपये दर ठेवलेला होता.त्यानुसार पहिल्या टप्प्यात गावकऱ्यांना ४०० /- रुपये प्रमाणे रक्कम मिळाली होती व उर्वरित रक्कम २२५ /- बोनसच्या स्वरूपात मिळणार होती. ती रक्कम देताना सरकारी रजिस्टर A1बुक मध्ये गावकऱ्यांचे कमी पुढे दाखवण्यात आले आणि A1 रजिस्टर मध्ये स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावाने हजारो पुढे चढवून बोनसचे उर्वरित रक्कम फळीमुंशिनी उचल केली आहे. तसेच A1 रजिस्टर मध्ये अल्पवयीन मुलाच्या नावाने नामे आकाश राजू नरोटे वय १७ (वर्ष,) ५०० पुढे चढवून बाल गुन्हेगार कायद्याचा उल्लंघन केला आहे.newsjagar
फळीमुंशींनी गावकऱ्यांच्या पुड्याची अफरातफर करून पुड्याच्या संख्येनुसार बोनस न दिल्यामुळे गावकऱ्यांची फसवणूक केली आहे ,अशी माहिती चामोर्शी पोलीस स्टेशन येथे गावकऱ्यांनी दिली आहे. या फळीमुंशिवर लवकरात लवकर कारवाई करून गावकऱ्यांना न्याय व उर्वरित बोनस देण्यात यावा अशी मागणी सर्वत्र गावकरी करत आहेत.
फळी मुंशींच्या नात्यातील व्यक्ती चा नावे त्यांनी पुड्यांची अफरातफर केली असून ,वडील,भाऊ,पुतण्या,वाहिनी,भावसुन व अल्पवयीन मुलगा ,यांच्या नावे फळी मुनशींनी अधिक पुडा दाखवून गावकऱ्यांचे पुढे कमी करून गावकऱ्यांची फसवणूक
वरील प्रकारे फळी मुनशींनी आपल्या नातेवाईकांच्या नावे अधिक बुडा दाखवून गावकऱ्यांचे पुढे कमी करून गावकऱ्यांची फसवणूक केली आहे. असा आरोप श्री मुकेश रामजी जनबंधू, श्री सुमित बंडूची चीचघरे, श्री मनोज आनंदराव साखरे, श्री उमाकांत जनार्दन दुर्गे सह गावातील नागरिक करीत आहे.