अन…चिमूरकराना पडला शहीद स्मृती प्रवेशद्वाराचा विसर.

मग कसा होईल स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

*बिना तिरंग्याने शहीद प्रवेशद्वार

चिमूर शहर इंग्रज राजवटीत लढा दिला असून, चिमूर चा इतिहास देशभर गाजला आहे. इंग्रजाच्या गुलामीतून देश स्वातंत्र व्हावा म्हणून चिमूर कर्मभूमितील शहीद वीरांनी आपल्या प्राणांची आहुती सुद्धा दिली. या शहीद क्रांती ची मशाल तेवत राहण्यासाठी व शहीद क्रांती विराची आठवण राहण्यासाठी चिमूर शहरात उपजिल्हा रुग्णालया जवळ चिमूर सुरु होताच या ठिकानी चिमूर क्रांती शहिद प्रवेशद्वार 2004 ते 2009 या वर्षत माजी आमदार डाँक्टर अविनाश वारजूरकर हे आमदार असतांना उभारण्यात आले. मात्र आज या शहीद प्रवेशद्वाराचा विसर चिमूर वासीयांना पडला असल्याचे दिसून आले.

भारत देशात मागील तीन दिवसांपासून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या धूमधडाक्यात करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी स्वातंत्र महोत्सव निमित्याने शासकीय कार्यालये रोषणाईने चकाचक केले आहे. तर शासनाने हर घर झेंडा अभियान मागील 3 दिवसापासून भारत भर राबविले आहे. अनेक नागरिक आपल्या घरावर झेंडा लावून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. मात्र चिमूर क्रांती लढा देऊन देश गुलामीत असतांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भाजनाने “झाड झाडुले शस्त्र बनेंगे पत्थर सारे बाँम्ब..! बनेंगे भक्त बनेगी सेना नाव लगेगी किनारे” या झालेल्या भाजनाने चिमूर क्रांतीतील नागरिक प्रेरित झाले. व या झाड झाडुले व पत्थर हातात घेऊन 1942 ला इंग्रजासोबत हातापायी करण्यात आले यात अनेक क्रांतिवीर शहिद झाले तेव्हा देश गुलामीत होते मात्र चिमूर 3 दिवस स्वतंत्र झाले होते. याच चिमुरातून स्वातंत्र्याची पहिली सुवर्ण पहाट उगवली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या भजनानुसार चिमूर क्रांती चे देशात नाव अजरामर झाले. या लढ्यात चिमूर क्रांती भूमीतील क्रांतिवीर बालाजी रायपूरकर हे प्रथम शहीद झाले. याच शहीदाना प्रत्येक वर्षी उजाळा देण्यासाठी व चिमूर क्रांती लढ्याचा इतिहास अजरामर ठेवण्यासाठी शहीद प्रवेशद्वार उभे करण्यात आले. मात्र आज चिमूर क्रांती भूमीतील वासीयांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव ज्या चिमुरातून स्वातंत्र्याची पहिली सुवर्ण पहाट निघाली त्या चिमुरातील शहीद प्रवेशद्वाराचा नागरिकांना विसर पडलेला दिसून येत असून, बिना तिरंग्याने हे प्रवेशद्वार दिसून येत आहे.
या शहीद स्मृती प्रवेशद्वाराबाबद्द लोकप्रतिनिधी चे सुद्धा दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे